ब्रह्माकुमारीज संस्थेच्या प्रथम मुख्य प्रशासिका जगदंबा सरस्वतीचा स्मृती दिन साजरा.
ब्रह्माकुमारीज संस्थेच्या प्रथम मुख्य प्रशासिका जगदंबा सरस्वतीचा स्मृती दिन साजरा.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------------
प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोड सेवा केंद्रावर ब्रह्माकुमारीज संस्थेच्या प्रथम प्रशासिक माँ जगदंबा सरस्वती यांचा स्मुर्ती दिन विशेष ज्ञान योग तपस्या करुन साजरा करण्यात आला. ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र रिसोड च्या संचालिका राजयोगिणी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी जगदंबा सरस्वती उर्फ मम्माचे संस्थेच्या विकासासाठी केलेले अद्भुत कार्य सांगताना सांगितले की जगदंबा सरस्वती ज्यांना सर्व प्रेमाने मम्मा म्हणत होते. मम्मानी राजयोगाचा अभ्यास करवून घेताना सात्विक भोजन व संयमीत दिनचर्या यामुळे जीवन सहज आणि सुखी बनविण्याची शिक्षा दिली. मम्माचा सर्वोत्तम गुण होता ईश्वरीय सेवेसाठी सदैव तयार राहणे व नेहमी हाजी चा पाठ पक्का ठिवीत होत्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ईश्वरीय सेवेत समर्पित करुन वेळेवर ध्येय गाठून आत्मिक स्थिती धारण करुन इतरांनाही प्रेरित केले.मम्मा अतिशय प्रेमळ, शिस्तप्रिय आणि सर्वगुणसंपन्न असल्यामुळे 24 जून हा त्यांचा स्मुर्ती दिन संपूर्ण विश्वातील ब्रह्माकुमारीज परिवारात आदराने साजरा केला जातो. रिसोड सेवा केंद्रात संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाला बीके गीता दीदी , बीके वंदना दीदी सह ब्रह्माकुमारीज परिवारातील ज्ञानार्थी भाऊ बहिणी मोठया संख्येने उपस्थित होते. मम्माच्या स्मुर्ती दिनानिमित्त प्रसादाचे वितरण करण्यात आले.
Comments
Post a Comment