रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन.

 रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजितसिंह ठाकूर. 

-----------------------------------

रिसोड येथील लोणी फाटा येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने 1जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनातील 8,9,10 एप्रिल 2024 चा उन्हाळी पिकाचे नुकसान झाले असून त्याचा मोबदला देण्यात यावा, भावांतर योजनेनुसार शेतकऱ्यांना सोयाबीनचा मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, पीक कर्ज वाटप न करणाऱ्या व पीक कर्ज देण्यास दिरंगाई करणाऱ्या सहकारी खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्यात यावी स्पिंकलर व ड्रीपची सबसिडी तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी रिसोड येथील भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने एक जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता रिसोड शहरातील लोणी फाटा या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांना देण्यात आली आहे.यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष विकास झुंगरे, वैजनाथ रंजवे, केशव गरकळ, जालिंदर देवकर, पवन खोडकर त्यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.