कौलव येथे नवागताचे उत्साहात स्वागत.
कौलव येथे नवागताचे उत्साहात स्वागत.
-------------------------------------
फ्रंलाईन न्यूज महाराष्ट्र
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-------------------------------------
राधानगरी तालुक्यातील कौलव येथे पहिल्या दिवशी कौलव हायस्कूल आणि कौलव केंद्र शाळेत नवागताचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले.
उन्हाळी सुट्टी संपली आणि शनिवारी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली सकाळपासून पुन्हा शाळा गजबजून गेल्या.नव्या मित्र मैत्रिणींची सोबत तसेच घरच्या वातावरणातुन शाळेतील वातावरणात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हुरहुर दिसून येते होती.
सकाळी पालकांसह विद्यार्थी शाळांमध्ये येण्यास सुरुवात झाली.शाळेच्या प्रवेशद्वार जवळ आकर्षक कमानी उभारल्या होत्या.ढोल ताशांच्या गजरात स्वागत औक्षण करून गुलाब पुष्प देऊन कौलव हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, संस्था उपाध्यक्ष अशोक पाटोळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बी के सरनाईक सर,अमोल लाड सर, रोहित पाटील सर ,जी बी पाटील सर बीडी गोंगाणे सर ,रवी पाटील आदिसह संस्था पदाधिकारी, शिक्षक स्टाप, कर्मचारी, विद्यार्थी ,पालक उपस्थित होते तसेच कौलव केंद्र शाळेत मुख्याध्यापक पंडित चव्हाण सर यांच्या हस्ते नवागताचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संदीप मगदुम सर , देसाई म्याडम, पाटील म्याडम,बरगे म्याडम,बबन पाटील सर, शिवाजी पाटील सर आदींसह शालेय शिक्षण कमिटी पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.स्वागतावेळी शालेय पुस्तके, साहित्य खाऊ वाटप करण्यात आले
Comments
Post a Comment