बस्तवडे येथे शिव राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा.

 बस्तवडे येथे शिव राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार 

------------------------------------

          सहा जून शिव राज्याभिषेक दिन औचित्य साधून ग्रामपंचायत बस्तवडे च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय समोर छत्रपती शिवाजी महाराज व राज्याभिषेक दिन प्रतिमा पूजन कार्यक्रम करण्यात आला . यावेळी प्रतिमापूजन गावचे सरपंच सौ. जयश्री सातापा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला . तर राज्याभिषेक आनंद उत्सव दिन म्हणून राज दंड उभा करण्यात आला होता त्याचे पूजन जगदंबा सेवा संस्थेचे संचालक श्री शिवाजी विष्णू वायदंडे यांच्या हस्ते करणेत आले. ‌. तर यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते ‌ साताप्पा कांबळे यांनी केले . यावेळी त्यांनी राज्याभिषेक दिनाचे थोडक्यात माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या . यावेळी गावचे उपसरपंच श्री प्रवीण पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष श्री जी.एल. पाटील‌ , ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री. पांडुरंग वांगळे ,‌ गंगाधर शिंत्रे , सुभेदार माळी ,‌ तंटामुक्ती समिती सदस्य श्री शिवाजी मारुती पाटील , सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले , माजी सरपंच श्री. आप्पासो माळी , श्री संतोष पाटील , सामाजिक वनीकरण अधिकारी श्री .शिवाजी माळी ,‌ श्री. मधुकर यादव , सुहास गायकवाड‌ , श्री कमलेश पाटील , श्री ओंकार माळी , माजी सैनिक शिवाजी पाटील , पांडुरंग माळी , ग्रामपंचायत कर्मचारी श्री सातापा नरके , बबन वायदंडे इत्यादी हजर होते . यावेळी शेवटी सर्वांचे आभार ग्रामपंचायत सदस्य श्री जयवंत पाटील यांनी मांडले . शेवटी सर्वांना राज्याभिषेक उत्सव म्हणून सर्वांना बर्फी वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.