लातूर लोकसभेच्या विजयात लोहा-कंधार मतदारसंघातून शेकापचा सिंहाचा वाटा.

 लातूर लोकसभेच्या विजयात लोहा-कंधार मतदारसंघातून शेकापचा सिंहाचा वाटा.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

-----------------------------------

 लातूर लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजपाचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा यांचा दारुण पराभव केला, शेकापाचे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लोहा कंधार मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांसह गाव, वाडी, तांड्यावर प्रत्यक्ष मतदाराच्या भेटीगाठी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना लोहा कंधार मतदारसंघातून लाखोंचे मताधिक्य मिळवून देण्याचे मतदारांना आवाहन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेला केले होते, आमदार शिंदे व आशाताई शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर लोहा-कंधार मतदारसंघातील लाखो मतदारांनी विश्वास ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवून दिल्याने डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी झाला आहे. लोहा-कंधार मतदारसंघावर आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांची आपल्या विकासाभिमुख कार्याने मतदारसंघावर मजबूत पकड झाल्याचे लातूर लोकसभेच्या विजयावर शिकामोर्तब केल्याचे दिसून येत आहे, शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांच्या व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अथक मेहनतीमुळे लोहा-कंधार मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयामध्ये शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.