स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगांव पोलीस ठाणे यांची धडाकेबाज कारवाई. नागठाणे येथे घडलेला खुनाचा गुन्हा ४ तासाचे आत उघड करुन आरोपींना अटक.
स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगांव पोलीस ठाणे यांची धडाकेबाज कारवाई. नागठाणे येथे घडलेला खुनाचा गुन्हा ४ तासाचे आत उघड करुन आरोपींना अटक.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर.
-----------------------------------
दिनांक १६/०६/२०२४ रोजीचे सायंकाळी ५.०० वा. पासून ते रात्री ८.०० वा.चे दरम्यान नागठाणे ता.जि. सातारा येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन इसम नामे रोहिदास मारुती पन्हाळकर वय २१ वर्षे रा. करंजोशी ता. कराड जि. सातारा याचे शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचा खून केल्याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्याने बोरगांव पोलीस ठाणे गुरनं २९४/२०२४ भादंवि कलम ३०२ प्रमाणे दिनांक १७/६/२०२४ रोजी दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली सपोनि पृथ्वीराज ताटे व सुधीर पाटील यांचे एक पथक तयार करुन तपासकामी बोरगांव पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते.
सदर पथकाने नागठाणे येथे जावून गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवून तेथील परिस्थितीची माहिती घेवून पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे बोरगांव पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांचे समवेत तपास केला असता मयतास दोन इसमांनी सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे उपचाराकरीता दाखल केले होते व वैद्यकिय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केले होते. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद दोन इसमांच्याकडे कसोशिने व कौशल्याने तपास केला असता त्यांनी सांगितलेल्या हकिकतीमध्ये व गुन्हा घडलेच्या परिस्थितीमध्ये तफावत आढळून आल्याने तपास पथकाने त्यांच्याकडे अधिक कौशल्याने तपास केला असता सदर दोन इसम व त्यांचे इतर ७ साथीदार यांनी मिळून सदर खूनाचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी नामे १) ओंकार हणमंत पन्हाळकर वय २० वर्षे रा. करंजोशी ता. कराड जि. सातारा २) निखील रमेश पन्हाळकर वय २२ वर्षे रा. करंजोशी ता. कराड जि. सातारा ३) रोहित मारुती पवार वय २१ वर्षे रा. करंजोशी ता. कराड जि.सातारा ४) आदित्य नामदेव पवार वय १८ वर्षे रा. गडकरआळी सातारा ५) साहिल जयसिंग पिंपळे वय १९ वर्षे रा. मालोशी ता.पाटण जि.सातारा ६) तेजस सचिन पन्हाळकर वय २१वर्षे रा. करंजोशी ता. कराड जि.सातारा ७) कुमार एकनाथ पन्हाळकर वय २२ वर्षे रा. करंजोशी ता.कराड जि.सातारा ८) देवेंद्र बनाजी घाडगे वय २८ वर्षे रा. करंजोशी ता. कराड जि.सातारा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदरचा खून छेडछाडीच्या संशयावरुन केला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील व बोरगांव पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर खूनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासून ४ तासाचे आत उघड केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विजय कांबळे, संजय शिर्के, अतिष घाडगे, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, मनोज जाधव, अमित माने, अरुण पाटील, सनी आवटे, अमित झेंडे, राज कांबळे, अजय जाधव, रोहित निकम, धीरज महाडीक, प्रविण कांबळे, स्वप्निल दौंड, प्रविण पवार, स्वप्निल कुंभार, पृथ्वीराज जाधव, मोहन पवार, वैभव सावंत, विक्रम पिसाळ, बोरगांव पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे, पोउनि निकम, पोलीस अंमलदार अमोल सपकाळ, दादा स्वामी, विजय म्हेत्रे, विशाल जाधव, बाळासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment