कृषि महाविद्यालय रिसोड मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा.
कृषि महाविद्यालय रिसोड मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय रिसोड येथील राष्ट्रीय सेवा योजना युनिट अंतर्गत दिनांक 5 जून ला वृक्षारोपण करून जागतीक पर्यावरण दीन साजरा करण्यात आला. कृषि महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ. ए. एम.अप्तुरकर यांनी प्रास्तविक मधुन
मनुष्य आणि पर्यावरणाचे अतूट नाते आहे पण आपण मनुष्य आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला हानी पोहोचवतो रासायनिक खताचा वापर, वृक्ष तोड, हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण इत्यादी नैसर्गिक संसाधने दूषित करत आहोत. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्गात शिवाय आपलं जीवन शक्य नाही. म्हणून संयुक्त राष्ट्राने १९७२ पासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.डी.मसुडकर यांच्या नेतृत्त्वात पर्यावरण जनजागृती करणे हेतू वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. कृषि महाविद्यालय रिसोड परीसर व करडा परिसर लगत स्वच्छ्ता अभियान राबवून पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहला सुरुवात झाली.'एक माणूस एक झाड' असेल याचा प्रयत्न करूया असा संदेश राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवका मार्फत या वेळी देण्यात आला.
कृषी महाविद्यालय चे विशेष तांत्रीक समन्वयक मा.आर.एस.डवरे आणि डॉ.ए.एम.अप्तुरकर प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डी. डी. मसुडकर , क्रिडा अधिकारि प्रा.एल.बी.काळे तसेच संपूर्ण कर्मचारी वृंद कृषि महाविद्यालय रिसोड यांच्या सहकार्याने पर्यावरण जनजागृती व स्वच्छ्ता सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
Comments
Post a Comment