सांगवडे ग्रामपंचायत ने ओवरफुल झालेल्या सौचालयची घेतली तात्काळ दखल.
सांगवडे ग्रामपंचायत ने ओवरफुल झालेल्या सौचालयची घेतली तात्काळ दखल.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी/- सांगवडे मधील मातंग समाजा नजीक असलेली सार्वजनिक शौचालय टाकी ओवरफुल झाल्याने मातंग समाजातील व इतर समाजातील महिलांचे शौचालय जाण्यास गैरसोय होत होती. असे समजताच मातंग समाजातील तरुण कार्यकर्ते अंकुश चांदणे तसेच काही महिला वर्ग यांनी ग्रा.प. सरपंच रूपाली कुंभार, डे.पो.डी देसाई मॅडम,ग्रा.पं सदस्य शितल भेंडवडे, सदस्य संपदा सोनवणे यांची भेट घेऊन शौचालय टाकी साफ करण्यात यावी अशी विनंती केली. तसे लगेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी वर्ग यांनी गांभीर्याने विषय मनावर घेऊन. तात्काळ मैला टाकी स्वच्छ करणारी गाडी बोलवून टाकी स्वच्छ करण्यात आली. त्याबद्दल सांगवडे ग्रामपंचायत यांचे महिलांच्या व या ठिकाणी सतर्क असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने व इतर समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment