शाहूंची जलनीती देशाला दिशादर्शक राधानगरीतील सिंचन परिसंवादातील सूर.

 शाहूंची जलनीती देशाला दिशादर्शक राधानगरीतील सिंचन परिसंवादातील सूर.


-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------------

   जलसिंचनामध्ये तंत्रज्ञान व विज्ञानाची मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असली तरी संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेली जलनीती ही देशाला आजही दिशादर्शक असल्याचा सूर

राधानगरीच्या परिसंवादात उमटला.

    पाटबंधारे विभागाच्या वतीने 'श्री.शाहू महाराज व त्यांचे जलसिंचन धोरण' या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता सौ स्मिता माने या होत्या.

    यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ जे के.पवार म्हणाले की,शाहू महाराजांची जलनीती ही सर्वसामान्य प्रजेला केंद्रवर्ती ठेवून केलेली होती.ही जलनीती क्रांतिकारक अशीच असून त्यातही शेतीसाक्षरतेला अधिक महत्व असल्याने समाजाचे अर्थकारण वाढतच गेले.

   डॉ.चंद्रशेखर कांबळे यांनी आज पाण्यावरून प्रादेशिक वाद व संघर्ष होत आहेत.मात्र शाहू महाराजांना शतकापूर्वी या पाण्याचे भविष्य समजले होते.वर्तमानातील जलप्रकल्प,त्यांची गळती पाहता तुलनेत गुणवत्ता हाच शाहूंच्या जलकार्याचा निकष होता.त्यांनी माती आणि पाण्यात केलेली गुंतवणूक काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे अशी मांडणी केली

    माजी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी राधानगरी धरण सिंचनाची धोरणे उलगडून दाखविताना महाराजांच्या जीवित कार्यावर प्रकाश टाकला.दुष्काळात शाहूंनी विहिरी,

तळी,तलावांचे बांधकाम व दुरुस्ती 

करून त्यासाठी आपला दरबारी खजिना रिकामे करताना राबविलेल्या योजनांची माहिती प्रा.प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केली.

   पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी संस्थानातील जलसंधारण,जल संवर्धनाचे आणि जल स्वच्छतेचे महत्व विशद केले.अध्यक्ष सौ स्मिता माने यांनी परिसंवादाचा परामर्श घेताना पाण्याचे महत्व सांगितले.प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले.स्वागत व प्रास्ताविक उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर यांनी केले.यावेळी तहसीलदार अनिता देशमुख,समीर निरूखे,हर्षल जाधव,

प्रतिभा कासार,अभियंता प्रशांत कांबळे, सचिन भाटळे, नंदकुमार सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन शशिकांत बैलकर यांनी केले.आभार समीर निरुखे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.