१ जुलै २०२४रोजी पासुन देशात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी सुरू .
१ जुलै २०२४ रोजी पासुन देशात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी सुरू .
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे.
----------------------------
भारत सरकार व देशातील नागरीक, लोकप्रतिनिधी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विधीज्ञ, सेवानिवृत्त न्यायाधिश, पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली भारतामध्ये १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेले कायदे वसाहतवादी कायद्यांपासुन भारताला मुक्त करण्यासाठी, तसेच पिडीत व्यक्तीला न्याय व आरोपीस जास्तीजास्त दंड देणे या उद्देशाने देशामध्ये लागु असले भारतीय दंड संहिता १८६० फौजगारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ या कायद्यांमध्ये सुधारणा करुन नविन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला ऑगस्ट २०१९ मध्ये प्रारंभ करण्यात आले होते .
त्याअनुषंगाने जुन्या कायद्यामध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ही तीन विधेयके संसदेमध्ये सादर केले होते. सदरचे विधेयक दि. २५/१२/२०२३ रोजी मंजुर झाले आहे.
तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की दि. ०१/०७/२०२४ रोजी पासुन भारतीय दंड संहिता १८६० फौजगारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ ऐवजी नवीन भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे कायदे लागु होणार आहेत. त्या प्रमाणे राधानगरी पोलीस ठाणेमध्ये नवीन कायद्याची अंमलबजावणी दि. ०१/०७/२०२४ रोजी पासुन सुरुवात होणार असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली.
बातमी कशी पाठवायची
ReplyDelete