ऍडमिशन साठी लागणारे दाखले लवकरात लवकर वितरित करण्यात यांवे वंचित बहुजन आघाडी पक्षामार्फत निवेदन.
ऍडमिशन साठी लागणारे दाखले लवकरात लवकर वितरित करण्यात यांवे वंचित बहुजन आघाडी पक्षामार्फत निवेदन.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी/- कोल्हापूर जिल्हाधिकारी सो १० वी. १२ वी चे निकाल लागले असून मुलांची ऍडमिशन साठी धावपळ चालू झाली आहे. ऍडमिशन साठी लागणारे दाखले आपल्याकडून लवकरात लवकर वितरित करण्यात यांवे तसेच जातीचे दाखले वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासन यांनी 42 दिवसांची मुदत दिली असून पण प्रांत अधिकारी यांच्याकडे मार्च महिन्यापासून जातीचे दाखले प्रलंबित आहेत ते दाखले लवकरात लवकर वितरीत करण्याचे आदेश आपण द्यावेत व इथून पुढे त्यांनी असं करू नये यांची कल्पना त्यांना द्यावी. दाखल्यामुळे कोणत्याही मुलाचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षामार्फत सेवा हमी कायद्याचा वापर करण्यात येईल. सदर अर्जावर लवकर कारवाई करण्यात यावी ही विनंती ..
निवेदन स्वीकारताना
मा. संपत खिल्लारी
उपजिल्हाधिकारी महसूल
Comments
Post a Comment