Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर सनसनिखेज:- प्रेमात दगफटका झाल्याने प्रियंकारानी केली प्रेयसीची हत्त्या.

 चंद्रपूर  सनसनिखेज:- प्रेमात दगफटका झाल्याने प्रियंकारानी केली प्रेयसीची हत्त्या.

----------------------------------

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि 

 मंगेश तिखट

----------------------------------

असं म्हटल्या जातं की प्रेमात आणि युद्धात सर्वकाही जायज आहे, म्हणजे सूट आहे, प्रेम विश्वात हरवलेल्या व एकमेकांच्या दिलावर राज्य करणाऱ्या प्रेयसी किंवा प्रियंकारांनी एकमेकांस दगफटका दिला तर नंतर काय होतं याचे अनेक किस्से चित्रपटातील कथेतून तर कधी वर्तमानपत्रातून पाहायला व वाचायला मिळत असतें अगदी अशाच चित्रपटातील प्रेमकथेचा थरारक प्रकार वरोरा शहाराला लागून असलेल्या आनंदवन येथे घडला असून प्रेमभंग झालेल्या समाधान माळी यांनी 24 वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचा क्रूरपणे खून केल्याची सनसनिखेज घटना काल दिनांक 26 जून ला उघडकीस आली आहे, दरम्यान आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या खुनाचा तपास सुरू आहे.

आनंदवन येथील आनंद वनातील आश्रमात आई वडील यांच्यासोबत राहणाऱ्या 24 वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचे स्वतःचा उपचार करण्यासाठी आनंदवनात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी सोबत प्रेम जुळले होते, दरम्यान प्रेमाच्या आनाभाका घेऊन लग्न करण्याचं वचन एकमेकांना देऊन दोघेही प्रेमविश्वात वावरत होते, पण नियती वेगळं काही करत असतें, आरती ची नजर समाधानवरून हटून इतर व्यक्तीवर वळली आणि तिथेच प्रेमात ठिणगी पडली आणि मग सुरू झाला प्रेमाचा प्रतिशोध, काल अचानक आरतीचे आई वडील घरी नसल्याचा फायदा घेत समाधान आरती च्या घरी शिरला आणि दोघात कडक्याचे भांडण होऊन आधीच खून करण्याचा मनसूबा घेऊन आलेल्या समाधान याने आरतीवर चाकूने खुनी हल्ला केला आणि त्यातच तीचा प्राण गेला, रात्री 8 ते 8.30 दरम्यान आरतीचे आई-वडील घरी आले असता बाथरूम जवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता, आरतीची हत्या झाली ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली, तीचा जीव गेला होता, लगेच पोलिसांना खबर देण्यात येऊन मृतदेह छववीच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला.




24 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात?

खुणाच्या घटनेत अनेकवेळा कट्टर आरोपी हा फरार होतं असून तो लवकर सापडत नाही, पण ज्या व्यक्तीने वैमनस्य किंव्हा दगाफटका झालेल्या व्यक्तीचं मात्र तसं नसतं, कारण त्याला आपण केलेल्या कृत्याचे दुःख होतं नाही तर तो प्रतिशोध असल्याने तो पोलिसांना सरेंडर होतो, या प्रकरणात आरोपी समाधान हा सरेंडर झाला नसला तरी तो पळून गेला नाही त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत 24 तासात सापडला आणि त्यांनी स्वतःची प्रेमकहाणी सांगून हो खून मीच केला असं स्पष्ट सांगितलं, पण या घटनेणं प्रेमविश्वात मोठी खळबळ उडाली असून ” दगा किसीका सगा नही ना मानो तो करके देखो, जिसनेभी दगा दिया हैं जाकर उस्का घर देखो. ” शेवटी दगा अंगलट आला आणि त्यात मुलीचा जीव गेला तर मुलगा जेल मध्ये गेला यावरून प्रेमात कुणी दगाफटका करू नये हा संदेश या घटनेतून तरुण पिढीला मिळाला हें मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments