श्री शिवाजी विद्यालयात सामाजिक न्याय दिवस साजरा

 श्री शिवाजी विद्यालयात सामाजिक न्याय दिवस साजरा.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर 

------------------------------------

येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज दिनांक 26 जून 2024 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. आज विदर्भातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाले, त्यानिमित्ताने आज पहिल्याच दिवशी शाळेची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करून करण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी काळाची गरज ओळखून त्या काळामध्ये बहुजनांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची सुरुवात केल्याचे सांगितले, ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू महाराजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच कोणत्याही विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य संजयराव नरवाडे, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.विजय देशमुख यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.