Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रेमंड कंपनीतील ट्रेनी कामगारांचे आमरण उपोषण सुरूच ; कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष.

 रेमंड कंपनीतील ट्रेनी कामगारांचे आमरण उपोषण सुरूच ; कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कागल, प्रतिनिधी 

कृष्णात मालवेकर 

-----------------------------------

गेली ९ वर्षे कंपनी मध्ये ट्रेनी कामगार म्हणून अविरत सेवा बजावून सुध्दा कंपनी प्रशासनाने नियमित न केल्यामुळे कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र सदर उपोषणाची कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. इतकेच कमी की काय म्हणून कंपनीने कायद्याचा वापर करून आमरण उपोषणाची जागा देखील बदलण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले आहे. यामुळे एकूणच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या रेमंड उद्योग समूहातील रेमंड लक्झरी कॉटन कंपनी मध्ये कागल व परिसरातील अनेक कामगार गेली ९ वर्षे अविरत सेवा बजावत आहेत. आज ना उद्या कंपनी ट्रेनी कामगारांना नियमित सेवेत घेईल या आशेवर ९ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. तसेच गेली ९ वर्षे कोणत्याही पद्धतीची पगारवाढ सुध्दा कंपनीने लागू केली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर कंपनीतील सर्व ट्रेनी कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या दारात आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र त्यावर कंपनी प्रशासनाने कोणताच तोडगा काढला नाही. उलट कायद्याचा आधार घेत कर्मचारी उपोषण करत असलेली जागाच कायद्यानुसार नाही असे म्हणत आंदोलनाची जागा बदलण्यासाठी भाग पाडले असल्याचा कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे. 


या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ, कामगार आयुक्त व कंपनी यांच्यात बैठक झाली होती. मात्र त्यातून अजूनही तोडगा निघालेला नसल्यामुळे कर्मचारी आमरण उपोषणावर ठाम आहेत.

Post a Comment

0 Comments