Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विश्वंभर बाबा पायी दिंडी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान.

 विश्वंभर बाबा पायी दिंडी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान.

-------------------------------

मेढा प्रतिनिधी 

 शेखर जाधव

-------------------------------

 टाळी वाजवावी गुढी उभारावी , वाट ही चालावी पंढरीची " !! चला हो पंढरीला जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहु !! वै हभप भिकोबा महाराज देशमुख यांचे प्रेरणेने सुरू असलेली विश्वंभर बाबा वारकरी दिंडी सोहळा , वारकरी सेवा मंडळ , मेढा विभागाची दिंडी, दिंडी प्रमुख हभप अतुलमहाराज देशमुख यांचे उपस्थितीत शनिवारी २९ जुन रोजी मेढा येथील श्री विठ्ठल मंदिरातून प्रस्थान होणार आहे जावळीची राजधानी मेढा ते श्री क्षेत्र आळंदी ते श्री श्रेत्र पंढरपुर दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे आयोजीत केला आहे सदर दिंडीचा क्रमांक १६७ असुन दिंडी माऊलीचे रथाचे मागे असते .

      दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपुर पायी प्रवास होणार आहे पंढरपुर येथे पोहोचलेवर एकादशी नंतर द्वादशीचा प्रसाद घेवून दिंडी परतणार आहे तालुक्यातील वारकरी , किर्तनकार , प्रवचनकार ,टाळकरी , अन्नदाते , देणगीदार , मृदंगमणी , गायक , हितचिंतक यांचे सहकार्याने २९ वर्ष दिंडी सोहळा सुरू आहे तसेच

दिंडी मध्ये विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विशेष सहकार्य लाभणार आहे

दिंडी सोहळ्याचे विणेकरी ह.भ.प. शिवराम मोरे, मामुर्डी ह.भ.प.अनिल महाराज तोरणे आहेत दह्यारी, गांजे, मामुर्डी, माऊली ज्ञानेश्वर सांप्रदायीक मंडळ, डांगरेघर, वडूज, वाघापूर, जवळवाडी, पुनवडी,चोरांबे तसेच समस्त जावळीतील भजनी मंडळींची साथ लाभणार आहे दिंडीचे सेवेकरी ,विठ्ठल जुनघरे, विजय साहेबराव सावंत, नवनाथ चिकणे गांजे, दत्तात्रय धनावडे, सौ. वेणुबाई जगन्नाथ रांजणे असून

ट्रकसेवा ,मारूती आप्पा ढाणे राऊतवाडी , संपत घाडगे , सिताराम शेठ , नितीन मेंगळे , तसेच विलास पवार आबा यांची आहे . कै महादेव शेठ पवार यांचे स्मणार्थ पवार बंधु मेढा यांचे तर्फे मोफत पाण्याच्या टँकरची सोय करणेत आली आहे दिंडी सोहळ्यात सर्व 

भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन दिंडी चालक प्रमुख हभप अतुल महाराज देशमुख व अध्यक्ष नारायण (बबन ) श्रीपती धनावडे , तुकाराम देशमुख , उपाध्यक्ष दत्तात्रय खताळ , विठ्ठल सापते , अंजना भोसले , दिपेश महाराज जाधव , यशवंत महाराज वाटेगावकर ,नाना कदम यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments