हुंड्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह सासू नणंदा नंणंदेचे नवरे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल.

 हुंड्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह सासू नणंदा नंणंदेचे नवरे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

गांधीनगर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही असे म्हणत शिवीगाळ करत घरातून हाकलून देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद , शैलेजा स्वप्नील राजमाने (रा. महालक्ष्मी नगर उचगाव ता.करवीर) या महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.

यावरून पती सह सहा जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पती स्वप्निल लक्ष्मण राजमाने, सासू श्रीमती रंजना लक्ष्मण राजमाने, (दोघे रा उचगाव ता करवीर,) मोठी नणंद स्वप्ना लक्ष्मण देशमुख नंणंदेचा नवरा लक्ष्मण देशमुख (दोघे रा.कराड जि. सातारा ) लहान नणंद साधना प्रदीप कारदगे हिचा नवरा प्रदीप कारदगे (दोघे रा. इचलकरंजी,ता.हातकलंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी शैलेजा राजमाने आणि, स्वप्निल राजमाने यांचा विवाह, सहा महिन्यापूर्वी झाला होता. फिर्यादीच्या वडिलांची परिस्थिती नसताना तिच्या सासरच्या , लोकांनी लग्नात हुंड्यामधे, वॉशिंग मशीन, फ्रिज ,डायनिंग टेबल, सोफा सेट, अश्या , वस्तू मागितल्या होत्या पण परिस्थिती नसल्यामुळे मागणी केलेल्या वस्तू देऊ शकल्या नाहीत, म्हणून वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच नवीन, घेतलेल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही अशी धमकी दिली. आणी, घरातील कामे व्यवस्थित येत नाहीत, तसेच जेवण चांगले येत नाही कपडे धुण्यास येत नाही असे म्हणून वेळोवेळी मारहाण करून उपाशी ठेवले. याबाबत कुठेही वाचता केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन घरातून हाकलून दिले आहे.या कारणावरून पती ,सासू, दोन नणंदा नणंदाचे पती,अशा सहा जणांवर , गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास , पोलीस हवालदार रणजीत शिंगारे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.