कोणताही पुरावा नसताना गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघड. दोन आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई.
कोणताही पुरावा नसताना गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघड. दोन आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------
जयसिंगपूर पोलीस ठाणेचे हद्दीत कवठेसार, ता. शिरोळ गांवचे हद्दीत वारणा नदीत दि.21.06.2024 रोजी एका वयस्कर महिलेची बॉडी बारदानाचे पोत्यात बांधून टाकलेली व ती सडलेले अवस्थेत जयसिंगपूर पोलिसांना मिळून आली होती.
सदरची बॉडी ही कुजलेल्या अवस्थेत असलेने ओळख पटली नव्हती. तसेच सदर महिलेच्या उजव्या हातावर राम लक्ष्मण जोडी व बाशिंगचे गोंदण तसेच गळयामध्ये दोन तावीज याच गोष्टी होत्या. मयताची ओळख पटविणेकरीता फिंगर प्रींट ऑपरेटर यांचेकडून मयताचे फिंगरप्रींटची तपासणी केली परंतू मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने फिंगरप्रींट मिळून आल्या नाहीत. त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणेकडून प्राथमिक तपास करून अकस्मात मयत म्हणून दाखल करण्यात आले
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक इचलकरंजी निकेश खाटमोडे-पाटील , जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीमती रोहिणी साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेटी दिल्या. सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असलेने कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व जयसिंगपूर पोलीस ठाणेचे सहा तपास पथके तयार करून मयत महिलेची ओळख पटवून सखोल तपास करणेकरीता योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.पोलीस अधीक्षक यांनी केले मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचेसह एकूण पाच तपास पथके तयार करून सदर मयत प्रकरणाचा समांतर तपास चालू केला. तपासामध्ये मयत महिलेचा चेहरा ओळखत नव्हता मयत महिलेची ओळख पटवून तपास करणे याबाबत पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मयत महिलेचे प्रेत मिळाले पासून वारणा नदीचे पात्र येणारे मार्गावरुन नदीचे दोन्ही बाजूचे कोल्हापूर व सांगली जिल्हयातील गांवोगांवी जावून वयस्कर महिला कोणी बेपत्ता आहे अगर कसे याबाबत सातत्याने अहोरात्र तपासकार्य चालू ठेवले. तसेच नदीच्या आजूबाजूला येणाचा मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिरे, दर्गा या ठिकाणीदेखील तपास पथके तपास करीत होती.
दि. 26.06.2024 रोजी तपास पथकास गोपनीयरित्या माहिती मिळाली की, चंदूर येथील एक मुस्लीम वयस्कर महिला ही 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मोरे व दोन पथके यांनी चंदूर येथील गावात जावून गोपणीयरित्या चौकशी करत असताना अशी माहिती मिळाली 1 वर्षापुर्वी मुंबई येथून जरीना बेगम ही महिला तिचे नातेवाईकांकडे राहणेस आली होती परंतू अचानक ती गायब झाली आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे तिचे नातेवाईकाकडे व शेजारी तपास करीत असताना सर्व माहिती ही संदिग्ध स्वरुपात मिळत होती म्हणून मयतेचे बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण यास ताब्यात घेवून सखोल तपास केला असता मयत महिलेचे नाव जरीना बेगम मोहमंद युसुफ खान, अंदाजे वय 64 वर्षे रा. नागपाडा मुंबई (मुळ नांव शिवाली राठोड, मुळ गांव बागलकोट असे समजले जरीना बेगम ही वडीलांकडे लहानपणापासून चंदूर ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे राहणेस होती. तिने सुमारे वीस वर्षापुर्वी प्रेमविवाह करून मुंबई येथे गेली. लग्नानंतर जरीना बेगम ही तिचे पतीसमवेत नागपाडा मुंबई येथे पतीचे स्वतःचे मालकीचे घरी राहत असताना अडीच
वर्षापुर्वी तिचा पती मयत झाला. पतीचे निधनानंतर तिचे मालकीचे खोलीकरीता तिला पतीचे इतर नातेवाईक त्रास देत होते. मयतेस मुल नव्हते व तिचे आईवडीलही मयत झाले होते म्हणून तिने सदरची घटना तिचे बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास सांगीतली. त्यानंतर प्रकाश चव्हाण याचे सांगणेप्रमाणे मयत जरीना बेगम हीने मुंबई येथील पतीचे नांवे असलेली खोली 28,00,000/- रुपयास विक्री करुन मिळालेले पैशासह ती मुंबई येथून निघून तिचे बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याचेकडे चंदूर, ता. हातकणंगले येथे गेले 1 वर्षापासून राहणेस होती. मयत जरीना बेगम हीला त्वचारोग होता व ती घरात कोठेही संडास करत होती तसेच तिचेकडे खोली विक्रीचे पैसे होते. तिला ठार मारले तर तिचेपासून होणारा त्रास कमी होईल व तिचे पैसे आपणास मिळतील या उद्देश्याने मयतेचे बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण, व.व.37, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याने दि. 11.06.2024 रोजी रात्रौचे वेळी जरीना बेगम हिला 4 झोपेच्या गोळया देऊन तद्नंतर तिचा गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करणेचे उद्देश्याने मयत जरीना बेगम हिचे प्रेत त्याचा मित्र राजू नायक याचे मदतीने पोत्यात घालून त्याचे पल्सर मोटर सायकवरुन नेवून ते कुंभोज ते दुधगांव जाणारे रोडवर असले वारणा नदीचे पुलावरुन नदीत टाकले असलेचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा दुसरा साथीदार राजू वालाप्पा नायक, व.व.36, रा. डीकेटी कॉलेज जवळ आसरानगर इचलकरंजी यास ताब्यात घेतले असता गुन्हा आपण केल्याचे सदर आरोपींनी कबूल केले.
आरोपी 01) प्रकाश सोमाप्पा चव्हाण, व.व.37, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर व 02) राजू वालाप्पा नायक, व.व.36, रा. डीकेटी कॉलेज जवळ आसरानगर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांचेकडून मयत जरीना बेगम हिने खोली विक्री करुन शिल्लक राहीलेले 14,50,000/- रुपये रक्कम व गुन्हा करणेकरीता वापरलेली पल्सर मोटर सायकल असा एकूण 15,40,000/- रु किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करत आहेत
Comments
Post a Comment