सेंट्रो कारच्या धडकेत दोन जण जागीच ठार तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू.

 सेंट्रो कारच्या धडकेत दोन जण जागीच ठार तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

शिवाजी विद्यापीठ कडून भरधाव आलेल्या सेंट्रो कार MH 09 BM 2892 या चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने दोन जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सायबर चौकात घडली

या अपघाताची अधिक माहिती अशी की .

शिवाजी विद्यापीठ कडून भरधाव येणाऱ्या सेंट्रो कार चालक वसंत मारुती चव्हाण यांनी चार मोटरसायकल स्वारांना धडक दिली व चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सिग्नल ला धडकून पलटी झाली यामध्ये कारचालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सायबर चौकात घडली 

या अपघातात 1)धनाजी शंकर कोळी व व 44 २)शुभांगी धनाजी कोळी व व 38 दोघे राहणार कणेरवाडी ३) समर्थ पंकज पाटील व व 1 ४) प्रथमेश सचीन पाटील व व 19 ,५) जयराज संतोष पाटील व व 19 रा असळज ता गगनबावडा हे सर्व जखमी झाले तर

हर्षद सचीन पाटील अनिकेत आनंदा चौगुले चालक वसंत मारुती चव्हाण यांचा हे जागीच गतप्राण झाले तर रुग्णालयात जखमी पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.