सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम यांनी गळफास घेत संपविले जीवन.

 सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम यांनी गळफास घेत संपविले जीवन.

---------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

---------------------------------

सांगली अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नवलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावाचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान (सुरज जनार्दन निकम वय 30 )यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून खानापूर तालुक्यावर शिवकाळ पसरली आहे. 

नागेवाडी नागनाथ नगर येथील सुपुत्र सुरज निकम यांनी अल्पवधीत कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करून आपला धबधबा निर्माण केला होता कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना आसमान दाखविले होते त्यांनी अल्पवधीतच कुस्ती क्षेत्रात नवलौकिक निर्माण केला होता गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी कुमार महाराष्ट्र केसरीची गदा पटकवले होती सुरज निकम हा वडिलांच्या निधनानंतर व्यथित होता शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथील जुन्या राहत्या  घरातील एका खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली 

हा प्रकरण नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचे मामा भास्कर ज्योतीराम जाधव पैलवान सुरज याला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. 

मात्र त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले कुमार महाराष्ट्र केसरी निकम यांचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला आहे त्याच्या पश्चात आई पत्नी भाऊ असा परिवार आहे आत्महत्येचे वृत्त समजतात वस्ती क्षेत्रासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शिवककाळ पसरली आहे 

आत्महत्याची नेमकी कारण समजू शकले नाही विटा ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

पैलवान सुरज चा भाऊ आसाम येथे व्यवस्थापनानिमित्त असल्याने ते आल्यानंतर शनिवार दुपारी सुरज निकम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात करण्यात आले या घटनेची नोंद विटा पोलिसात झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.