मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी प्राचार्य एस. टी. कदम.

 मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी प्राचार्य एस. टी. कदम.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील 

--------------------------------

तालुक्यात मराठी विषयाचा कौतुकास्पद निकाल.

चंदगड: "मातृभाषेतून घेतलेलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरते" असे मत  प्राचार्य एस.टी. कदम यांनी व्यक्त केले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले "कष्टाने मिळवलेली यश चिरकाल टिकते.यशासाठी  मध्यम मार्ग निवडण्यापेक्षा पायाभूत ज्ञानाची आस धरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून अध्ययन केल्यास त्याचा जीवनामध्ये चांगला उपयोग होईल." श्रीराम विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती राजेंद्र पाटील हिने मराठी विषयात सर्वाधिक 97 गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यासह तालुक्यातून एकूण 35 विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एन. पाटील यांनी केले. मुख्याध्यापक जी.आर. कांबळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला तर चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या तालुका समन्वयक पदी मोहन पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

राज्यात मराठी विषयाचा निकाल चिंताजनक लागला तरी  तालुक्यात मराठी विषयाचा निकाल कौतुकास्पद लागला आहे.

यावेळी महादेव शिवणगेकर, ए.के. पाटील, ए. एम. इमानदार, आर. जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला अध्यापक संघाचे अध्यक्ष रवि पाटील, एस. पी. पाटील,एस. एल. बेळगावकर, व्ही. एल. सुतार, के.आर. कर्निक, दिपा बल्लाळ, एम. वाय. पाटील, एन. टी. नागेनट्टी, प्रेमा पवार व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी तर आभार संजय साबळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.