पोलीस भरतीसाठी येणा-या उमेदवारांना कोल्हापूर पोलीस दलातर्फे आवाहन.

 पोलीस भरतीसाठी येणा-या उमेदवारांना कोल्हापूर पोलीस दलातर्फे आवाहन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

कोल्हापूर जिल्हयामध्ये दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासुन पोलीस भरती प्रक्रियेस सुरवात होत आहे, भरती प्रक्रियेचा पहीला टप्पा मैदानी चाचणी असुन ती दिनांक २७/०६/२०२४ रोजी पर्यंत चालणार आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई पदासाठी १५४ तर चालक पोलीस पदासाठी ५९ अशी एकुण २१३ पदाची भरती प्रक्रिया घेणेत येणार आहे. सदरच्या पदासाठी एकुण ११, ४४५ अर्ज प्राप्त झालेले असुन प्रत्येक दिवशी १४०० उमेदवारांची चाचणी घेणेत येणार आहे.


उमेदवारांनी नेमुन दिलेल्या तारखेस सकाळी ०५.०० वाजता आपल्या सर्व कागदपत्रासह पोलीस कवायत मैदान, कसबा बावडा कोल्हापूर येथे उपस्थित रहावयाचे आहे. सदरची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीत्या होणार असुन त्यासाठी आरएफआयडी, फेस रेकगनायझेशन या संगणकीय यंत्रणांचा वापर करणेत येणार आहे. सदरची भरती प्रक्रिया सुरु असताना उमेदवारांना कोणत्याही व्यक्तीकडुन अमिष दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता उमेदवार अथवा त्यांचे नातेवाईकांनी अशा अमिषाला बळी पडु नये. भरतीच्या अनुषंगाने कोणी आपणास अमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबतची माहिती आपण नियंत्रण कक्ष कोल्हापूर फोन न. ०२३१-२६६२३३३, डायल ११२, तसेच पोलीस उप अधिक्षक मुख्यालय, श्री नितीन सावंत मो.न.७२१८०८८५८५ या नंबरवर तात्काळ संपर्क करावा.


जे उमेदवार मैदानी चाचणी करिता येणार आहेत. त्यानी मौल्यवान वस्तु सोबत घेवुन येवु नये तसेच सोबत असलेली कागदपत्रे कोठे गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे परगांवाहून येणा-या उमेदवारांनी त्यांची वाहने पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत. भरती प्रक्रिया आवारामध्ये उमेदवाराच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांसाठी परेड ग्राऊन्ड या ठिकाणी पिण्याचे पाणी, ओआरएस याची व्यवस्था केलेली असुन, परेड ग्राऊंड येथे वैद्यकीय पथक नेमण्यात आलेले आहे. सर्व उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी न पडता शारिरीक चाचणी द्यावी असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.