भरधाव पिकअप च्या धडकेत तरुण जागीच ठार.
भरधाव पिकअप च्या धडकेत तरुण जागीच ठार.
-----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------
शुक्रवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास टोप कडून मादळे कडे जाणाऱ्या रोडवर भरधाव टेम्पो (टेम्पो क्रं.एम एच ०९ एफ एल ०३२७) ने मोपेडला (एम एच ०९ जी क्यू ७२३१) धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. सविस्तर माहिती अशी की , मनीष लालवन वर्मा वय वर्ष 19 सध्या रा. कासारवाडी ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर मूळ गाव मोहरवा, ता.
सिमरिया, जि. रीवा मध्य प्रदेश या टेम्पो चालकाने भरधाव वेगाने, बेफिकीरपणे गाडी चालवून समोरुन येणाऱ्या मोटरसायकल स्वाराला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की मोपेड स्वार रणजीत अशोक पाटील वय वर्ष 28 रा. मनपाडळे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली असून सदर टेम्पो चालकाविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
Comments
Post a Comment