वळिवडेत विवाह सोहळा रंगला सामाजिक बांधीलकी जपत दक्षिण आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
वळिवडेत विवाह सोहळा रंगला सामाजिक बांधीलकी जपत दक्षिण आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गांधीनगर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------
विवाह सोहळे कायम स्मरणात राहावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याचं पाहायला मिळत. मात्र करवीर तालुक्यातील वळीवडे येथील एका सेंट्रींग काम करणाऱ्या
आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नात
वड ,नारळ पेरू,सिताफळ,अशी 25 प्रकारची, वृक्षांची रोपटी वळिवडे ग्रामपंचायत कडे वधू आणि वर यांच्या हस्ते देण्यात आलं.
याच उपक्रमामुळे अनोखा ठरलेला हा विवाह सोहळा वळिवडे सह पंचक्रोशीतील गावामध्ये
चर्चेचा विषय बनला आहे.या विवाह सोहळ्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सौरभ च्या कुटुंबाने,सामाजिक बांधिलकी जपत विवाह सोहळा साजरा केलाय कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. असे असे बोलून सौरभ व मधुरानी यांना शुभेच्छा दिल्या.
लाडक्या लेकाचा विवाह सोहळा थाटात व्हावा अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र, लेकाच्या लग्नात जास्तीचा खर्च न करता पैसे वाचवून त्या बदल्यात वळीवडे
ग्रामपंचायतीकडे वृक्षांचे रोपटे वर व वधू यांच्या हस्ते देण्यात आले.
या विवाह सोहळ्यात झाडे लावा झाडे जगवा, दुष्काळाची नको नसेल आपत्ती तर वेळीच जपा जलसंपत्ती..पाणी अडवा पाणी जिरवा असे जनजागृतीपर फलक ही याठिकाणी मंडपात लावण्यात आले होते. यावेळी
आमदार ऋतुराज पाटील,जिल्हा परिषद चे कर्मचारी ,ग्रामपंचायत सदस्य कपिल घाडगे, सदस्य राजेंद्र मोहिते,सामाजिक कार्यकर्ते विजय शेळके यांच्या सह राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment