आठ कोटी खर्चूनही शहरात अंधारच.. आठ कोटींचे बल्ब गेले कुठे..? जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी - सिनेट सदस्य नवनाथ चव्हाण यांची मागणी.

 आठ कोटी खर्चूनही शहरात अंधारच.. आठ कोटींचे बल्ब गेले कुठे..? जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी - सिनेट सदस्य नवनाथ चव्हाण यांची मागणी.


----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा  प्रतिनिधी

अंबादास पवार

----------------------------

           शहरातील मुख्य रस्त्यासह शहरातील महत्त्वपूर्ण चौकात तसेच जुना लोहा शहरातील कलाल पेठ आणि इतर दलित वसाहतीत तब्बल आठ कोटी खर्च करून बसविण्यात आलेले बल्ब गेले कुठे.. ? दलीत वसाहतीतील बसविण्यात आलेले बल्ब गायब झाल्याने मागील अनेक कालावधीपासून शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष घालून लोहा शहरातील बल्ब संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी आणि लोहा शहराला अंधारातून प्रकाशात आणावे अशी मागणी सिनेट सदस्य तथा पं. स. सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण यांनी केली आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

            लोहा नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन यांच्यात साटेलोटे असल्याने मागील चार ते पाच वर्षात शहराचा विकास मोठ्या प्रमाणात खुंटला आहे. विकास कामाच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून विविध विकास कामात प्रचंड अनियमितता, टक्केवारी कारभार, कामाचा निकृष्ट दर्जा यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील हायमास सह पथदिवे बंदावस्थेत आहेत. सदर पथदिवे बसवावेत अशी मागणी शहर वाशियातून होत आहे. आजघडीला लोहा शहरातील पथदिवे हे शोभेचे बाहुले झाले असल्याचे दिसून येत आहे. अंधारामुळे शहर वाशियाना नाहक त्रास सोसावा लागत आहे. शासनाच्या योजनेतून राबविण्यात आलेल्या आठ कोटी निधी अंतर्गत दलित वस्तीतील बल्ब गेले कुठे..? याची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध कठोर कार्यवाही करावी व अंधारात चाचपडणाऱ्या शहर वाशियांना उजेडात आणावे अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते तथा सिनेट सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण यांनी केली आहे. लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सदरील प्रकरणी निवेदन देणार असल्याचे नवनाथ चव्हाण यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.