Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मा. जिल्हाधिकारी मॅडम च्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा पोस्टरचे अनावरण.

 मा. जिल्हाधिकारी मॅडम च्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा पोस्टरचे अनावरण.

-----------------------------------

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकुर 

-----------------------------------

दिनांक 29-06-2024 रोजी जि. वाशिम येथे 

माननीय. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस . मॅडम  यांच्या अध्यक्षतेखाली  नियोजन भवन  सभागृह वाशिम येथे प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हास्तरीय CSC-VLE, व बँक प्रशिक्षण  वर्ग खरीप हंगाम 2024 आयोजित करण्यात आले होते.

या मिटींगला प्रमुख अतिथी जिल्हा कृषी अधीक्षक श्री.आरिफ शहा सर ,कृषी उपसंचालक तथा जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री.एस .धनुदे सर. तालुका कृषी अधिकारी वाशिम श्री, जावळे सर, CSC जिल्हा व्यवस्थापक श्री.राजेश पडघन सर ,एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री.सोमेश देशमुख ,

जिल्ह्यातील  सर्व CSC संचालक तथा भारतीय कृषी विमा कंपनीचे सर्व तालुका प्रतिनिधी  उपस्थित होते. 



या प्रशिक्षण वर्गामध्ये माननीय अध्यक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. मॅडम व उपस्थित व्यासपीठाने खरीप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजना पोस्टरचे अनावरण केले .माननीय अध्यक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. मॅडम व प्रमुख अतिथी श्री.आरिफ शहा सर 

यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणा मधून सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण पेरणी क्षेत्राचा विमा संरक्षित करण्याचे आवाहन केले, त्याच बरोबर 1 रुपया मध्ये पिक विमा असून शेतकऱ्यांकडून जादा रक्कम न घेण्याचे आवाहन माननीय जिल्हाधिकारी यांनी केले.


या प्रशिक्षण वर्गामध्ये CSC प्रतिनिधींना नोंदणी करताना येणाऱ्या विविध अडचणी वरती चर्चा करून समाधा पूरक मार्गदर्शन करण्यात आले  आणि त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.

   वाशिम जिल्ह्यामध्ये एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी कार्यरत असून सर्व शेतकऱ्यांनी आपण पेरणी केलेल्या क्षेत्राचा अधिसूचित पिकाचा पिक विमा अंतिम तारखेच्या आत भरावा दिनांक 15 जुलै अंतिम तारीख असून सर्वांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. शेतकरी बँकेतून ,सीएससी केंद्रातून, आपला पिक विमा नोंदवू शकतात

Post a Comment

0 Comments