किया कारच्या धडकेत बोरवडे येथील महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी.
.किया कारच्या धडकेत बोरवडे येथील महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
--------------------------------
कोल्हापूर गारगोटी रोडवर फिरायला जात असणाऱ्या शांताबाई नामदेव कुंभार यांना किया सेलटोस गाडीने जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या तर आनंदी आनंद परीट या गंभीर जखमी झाल्या ही घटना आज पहाटे 5.45 वाजण्याच्या कोल्हापूर गारगोटी रोडवर घडली
या अपघाताची अधिक माहिती अशी की.
आज दिनांक 1/06/2024 रोजी नेहमी प्रमाणे शांताबाई नामदेव कुंभार वय वर्ष 72 आनंदी आनंदा परीट वय वर्ष 70 दोघेही राहणार बोरवडे पैकी कुंभारवाडा तालुका कागल या फिरायला गेल्या असता गारगोटी कडून कोल्हापूर या मार्गावर येणारी गाडी नंबर09 जी एम 7243 या गाडीने जोरदार धडक दिल्याने शांताबाई नामदेव कुंभार या जागीच ठार झाल्या तर आनंदी आनंदा परीट या गंभीर जखमी झाल्या.
या अपघाताची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली असून म पो स ई वाकळे हे आधीक तपास करत आहेत
Comments
Post a Comment