कुंभी कासारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राहूल खाडे.

 कुंभी कासारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राहूल खाडे.

-----------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

-----------------------------------

कुडित्रे (ता.करवीर) - येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी

राहूल बाजीनाथ खाडे (सांगरुळ)यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ माळवे होते. यावेळी अध्यक्ष माजी आ. चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

    उपाध्यक्ष पदाची संधी दरवर्षी एका संचालकांना देण्याचा फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे विश्वास पाटील (कोगे) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.शुक्रवारी नवीन उपाध्यक्षांची निवडीच्या बैठकीत राहूल खाडे यांचे उपाध्यक्ष पदासाठी संचालक अनिष जयसिंग पाटील (क। ठाणे) यांनी सुचवले. याला संचालक अनिल रावसो पाटील यांनी अनुमोदन दिले.

   निवडीनंतर अध्यक्ष माजी आ.चंद्रदीप नरके म्हणाले नरके घराण्यावर कुंभी कासारीच्या सभासदांनी प्रेम व विश्वास आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या राहूल खाडेंच्या वडील बाजीनाथ खाडे यांनी डी.सी.नरकेच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.संस्थेच्या हितासाठी मिळालेल्या संधीचा वापर करावा असे सांगितले. यावेळी उपाध्यक्षपदाची संधी देऊन आपल्यावर माजी आ.नरके व सर्व संचालक मंडळाने विश्वास दाखविला ही माझ्या साठी मोठा सन्मान आहे.याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यकारी संचालक धिरजकुमार माने यांनी स्वागत केले. यावेळी सर्व संचालक सेक्रेटरी प्रशांत पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.