लोकसभेच्या यशानंतर ॲड. नकुलदादांच्या नेतृत्वात भाजप मध्ये इनकमिंग पून्हा सुरु.
लोकसभेच्या यशानंतर ॲड. नकुलदादांच्या नेतृत्वात भाजप मध्ये इनकमिंग पून्हा सुरु.
-------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
-------------------------------
ॲड.देशमुख यांच्या नेतृत्वात वडप व डोंगरकिन्ही येथील युवक नागरिकांचा भाजप पक्ष प्रवेश* रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकुर
रिसोड -भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणावर आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व राज्याचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संघटन कौशल्य व लोकनेते माजी मंत्री श्री.अनंतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड.नकुलदादा अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात मालेगाव तालुक्यातील वडप व डोंगरकिन्ही येथील शेकडो युवक मंडळींनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही रिसोड विधानसभेत मोठ्या प्रमाणात युवक नागरिक व सर्व धर्मातील नागरिकांनी युवकांनी भारतीय जनता पक्षात ॲड.नकुल अनंतराव देशमुख भारतीय जनता पक्ष रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्या नेतृत्वात माननीय मा.मंत्री अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात आलेल्या निकालानुसार रिसोड व मालेगाव तालुक्यातून भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना मोठी आघाडी आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख नेतृत्वात रिसोड व मालेगाव तालुक्यातील ग्रामीण शहरी भाग तसेच शिरपूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत मताधिक्य दिले. या सर्व गोष्टी सोबतच मागील काही कालावधीत माजी मंत्री अनंतराव देशमुख, भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी मतदारसंघात राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे केली आहेत. सोबतच उत्कृष्टपणे युवक जेष्ठ यांचे संघटन तयार केले सोबतच लोकांच्या सुखदुःखाच्या कामात तत्पर राहण्याच्या त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत. रिसोड विधानसभेतील वडप व डोंगरकिनी येथील युवकांनी ज्येष्ठांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख, ॲड. नकुल देशमुख यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी कार्यक्रमास जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील भुतेकर, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री डॉक्टर उमेश तारे, जिल्हा सचिव सुनील आडे, भाजपा तालुका सरचिटणीस भूषण दांदडेआध्यात्मिक आघाडी रिसोड मालेगाव विधानसभा प्रमुख सुनील शर्मा,
भाजपा पंचायत राज अध्यक्ष गजाननराव देशमुख, अल्पसंख्याक रिसोड शहराध्यक्ष अल्ताफ शेख, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष संदीप धांडे सहित भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment