1 लाख 69 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरली पोलीसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह.
1 लाख 69 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरली पोलीसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंग ठाकूर
------------------------------
रिसोड शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे शहरातील बसस्थानकावर प्रवाशांचे सामानही सुरक्षित राहिलेले नाही.येथे दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत.1 जून रोजी दुपारी 2.30 वाजता एका महिलेच्या बॅगेतून दागिने, रोख रक्कम, आणि मोबाईल असा 1 लाख 69 हजार रुपये किमतीची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत मंगळवार बाजार हिंगोली येथील रहिवासी संध्या नारायण जाधव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती 27 मे रोजी कुटुंबासह रिसोड शहरातील बेंदरवाडी येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती. लग्न समारंभ व इतर विधी आटोपल्यानंतर आज 1 जून रोजी आपल्या मुलासोबत रिसोड बसस्थानकावर अकोल्याकडे जाणाऱ्या बस मधे बसली होती.संध्या जाधव यांच्या मुलाकडे एक बॅग होती त्यात त्यांनी पर्स ठेवली होती. पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोनसह 1 लाख 69 हजार रुपयांच्या वस्तू होत्या. बसमध्ये चढल्यानंतर बॅगेची चेन उघडी असल्याचे निदर्शनास येताच संध्या जाधव यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तेथून अज्ञात चोरट्यांनी पर्स घेऊन पलायन केले होते. पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध कलम १७९ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Comments
Post a Comment