शासकीय कर चुकवण्यासाठी चेसिस नंबर व रजिस्ट्रेशन नंबर मध्ये फेरफार करुन वाहने विकणारी टोळी जेरबंद व ( तीस लाख) रूपये किंमतीच्या 06 टेंम्पो ट्रॅव्हलर गाड्या जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.
शासकीय कर चुकवण्यासाठी चेसिस नंबर व रजिस्ट्रेशन नंबर मध्ये फेरफार करुन वाहने विकणारी टोळी जेरबंद व ( तीस लाख) रूपये किंमतीच्या 06 टेंम्पो ट्रॅव्हलर गाड्या जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकरवी चोरीस गेलेल्या वाहनांचा व चोरट्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे पथक गोपनियरित्या तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विनायक चौगुले यांना माहिती मिळाली की, पंकज मोरे, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर याच्याकडे दोन टॅम्पो ट्रॅव्हलर गाड्या असून सदर दोन्ही गाड्यांचे रजिस्ट्रेशन व चेसिस नंबरमध्ये फेरफार केला आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने स्था. गु. अ. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, ओंकार परब, आयुब गडकरी यांचे पथकाने दि.05.06.2024 रोजी पोर्ले, ता. पन्हाळा येथे जावून पंकज तानाजी मोरे, व. व.25, रा. पोर्ले, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर याचेकडील टेंम्पो ट्रॅव्हलर गाड्या नंबर MH-20-AS-5186 व MH-04-FK- 1251 या गाड्यांची व त्याचेकडील कागदपत्रांची खात्री केली असता सदर गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर व चेसिस नंबरमध्ये तफावत आढळून आली. त्याबाबत त्याचेकडे आधीक तपास केला असता त्याने सदर गाड्या या परमीटच्या होत्या व परमीट गाड्यांचे टॅक्सची रक्कम जास्त असते म्हणून बंद स्थितीत असणारे गाड्यांचे मालकाकडून त्यांचे गाडयांचे पेपर विकत घेवून ते त्यांचे कडील चालू स्थितीत असणारे गाड्यांचे नंबरवर टाकून विकत घेतलेली कागदपत्र दाखवून वाहन चालवित होते असे निदर्शनास आले. या बाबत त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले, व. व. 37, रा. प्लॉट नं. 18-बी, भारतीनगर, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर येथे एजंट यांचे मार्फत बंद वाहनांची कागदपत्र संबंधीत मालकाकडून कमी किंमतीत विकत घेवून गरजू लोकांना ती कागदपत्रे देवून त्या कागदपत्राचे आधारे त्यांच्या ओळखीचे करीम गफूर शेख, व. व. 52, रा. मौलाना आझादनगर, गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर व इम्रान मिस्त्री, रा. इचलकरंजी यांचेकडून त्याचे पांजरपोळ, यादवनगर, कोल्हापूर येथील गॅरेजमध्ये गाड्यांचे चेसिसीस नंबरमध्ये फेरफार करीत होते अशी माहिती पुढे आली. सदर माहितीव्दारे अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले व करीम गफूर शेख यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखी चार टेंम्पो ट्रॅव्हलर गाडयांचे नंबरमध्ये फेरफार केलेची कबुली दिली. अशा एकूण सहा टॅम्पो ट्रॅव्हलर वाहनांचे नंबरमध्ये फेरफार केलेचे निषन्न झाले. फेरफार केलेल्या 30,00,000/- रुपये किंमतीच्या एकूण सहा टॅम्पो ट्रॅव्हलर ताब्यात घेतल्या असून त्यांचे नंबर 01) MH-20-AS-5186, 02) MH-04-FK-1251, 03)MH-09-AQ-6261, 04)MH-12-KQ-2469, 05) MH-04-G-7472 व 06 ) MH-04 - G-8439 असे आहेत. सदरबाबत शासनाचा टॅक्स चुकविणेकरीता गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर व चेसिस नंबरमध्ये फेरफार करुन फसवणूक केले बाबत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे 01) अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले, व.व.37, रा. प्लॉट नं. 18 - बी, भारतीनगर, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 02) करीम गफूर शेख, व. व. 52, रा. मौलाना आझाद नगर, गोकूळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 03) पंकज तानाजी मोरे, व. व. 30, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, 04 ) रूपेश
विलास पवार, व.व.34, रा. 1382, बाईच्या पुतळ्याजवळ, राजारामपुरी, कोल्हापूर, 05 ) विशाल परशराम चव्हाण, व.व. 22, रा. अस्मिता नगर, अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर व 06) संभाजी आनंदा धनगर, व.व.33, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेवून राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, ओंकार परब, आयुब गडकरी, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली आहे.
Comments
Post a Comment