Posts

Showing posts from June, 2024

१ जुलै २०२४रोजी पासुन देशात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी सुरू .

Image
  १ जुलै २०२४ रोजी पासुन देशात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी सुरू . ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे. ---------------------------- भारत सरकार व देशातील नागरीक, लोकप्रतिनिधी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विधीज्ञ, सेवानिवृत्त न्यायाधिश, पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली भारतामध्ये १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेले कायदे वसाहतवादी कायद्यांपासुन भारताला मुक्त करण्यासाठी, तसेच पिडीत व्यक्तीला न्याय व आरोपीस जास्तीजास्त दंड देणे या उद्देशाने देशामध्ये लागु असले भारतीय दंड संहिता १८६० फौजगारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ या कायद्यांमध्ये सुधारणा करुन नविन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला ऑगस्ट २०१९ मध्ये प्रारंभ करण्यात आले होते . त्याअनुषंगाने जुन्या कायद्यामध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ही तीन विधेयके संसदेमध्ये सादर केले होते. सदरचे विधेयक दि. २५/१२/२०२३ रोजी मंजुर झाले आहे. तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की दि. ०१/०७/२०२४ रोजी पासुन भारतीय द

वेगावर मर्यादा ठेवा सातारा महाबळेश्वर रस्ता बनतोय मृत्युचा सापळा.

Image
  वेगावर मर्यादा ठेवा सातारा महाबळेश्वर रस्ता बनतोय मृत्युचा सापळा. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज भणंग प्रतिनिधी   प्रमोद पंडीत ---------------------------------    महाड=महाबळेश्वर-मेढा- सातारा-विटा रस्ता रूंद आणि चकचकीत झाला खरा.... पण......   वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण न ठेवल्याने हा रस्ता ठरतो आहे मृत्युचा सापळा.    विकासाच्या वाटेवर वेगवान प्रगती होत असताना, बेभान व बेधुंद होवून बेदरकारपणे गाडी चालवणार असाल तर हिच प्रगतीची वाट अधोगतीकडे जावून विनाशकारी ठरणार आहे. गेल्या दोन वर्षात महाबळेश्वर - सातारा रस्त्यावर झालेल्या अपघातांची संख्या व मृत्युदर पहाता अपवाद वगळता वहानांचा अतीवेगच कारणीभूत ठरत आहे.     २८ जुन चा शुक्रवार जावळीकरांसाठी घातवार ठरला असून आंबेघर नजिक सकाळीच अपघात झाल्याची बातमी आली. भविष्याची स्वप्ने पहाणारा वरोशीचा प्रविण कासुर्डे हा युवक जागीच ठार झाला.तर १२वीत शिकणारा संतोष कदम गंभीर जखमी झाला आहे.    याचदिवशी एक दुसरा अपघात रात्री ९ वाजताच्या दरम्यान हमदाबाज जवळ झाला.दोन दिवसापूर्वी सुट्टीवर आलेले केंजळ ता.जावळी येथिल फौजी श्री विशाल दत्तात्

मा. जिल्हाधिकारी मॅडम च्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा पोस्टरचे अनावरण.

Image
 मा. जिल्हाधिकारी मॅडम च्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा पोस्टरचे अनावरण. ----------------------------------- रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------- दिनांक 29-06-2024 रोजी जि. वाशिम येथे  माननीय. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस . मॅडम  यांच्या अध्यक्षतेखाली  नियोजन भवन  सभागृह वाशिम येथे प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हास्तरीय CSC-VLE, व बँक प्रशिक्षण  वर्ग खरीप हंगाम 2024 आयोजित करण्यात आले होते. या मिटींगला प्रमुख अतिथी जिल्हा कृषी अधीक्षक श्री.आरिफ शहा सर ,कृषी उपसंचालक तथा जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री.एस .धनुदे सर. तालुका कृषी अधिकारी वाशिम श्री, जावळे सर, CSC जिल्हा व्यवस्थापक श्री.राजेश पडघन सर ,एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री.सोमेश देशमुख , जिल्ह्यातील  सर्व CSC संचालक तथा भारतीय कृषी विमा कंपनीचे सर्व तालुका प्रतिनिधी  उपस्थित होते.  या प्रशिक्षण वर्गामध्ये माननीय अध्यक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. मॅडम व उपस्थित व्यासपीठाने खरीप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजना पोस्टरचे अनावरण केले .माननीय अध्यक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. गांजाचा साठा करुन ठेवणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक.

Image
  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. गांजाचा साठा करुन ठेवणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------------- पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थाचे सेवन, खरेदी, विक्री व साठा करणा-या साठेकर्राचा शोध घेवुन अंमली पदार्थ विरूध्द कठोर कारवाई करुन अंमली पदार्थाचा कोल्हापूर जिल्हयातुन समुळ नेस्तनाबूत करण्यासाठी  रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, कोल्हापूर यांना मुखशिल आदेश दिले होते. त्या मुखशिल आदेशानुसार  पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांनी कार्यालयीन पोलीस अंमलदार यांना कोल्हापूर जिल्हया मध्ये कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ खरेदी, विक्री, सेवन व साठा करणा-या लोकांचा शोध घेवुन त्यांचे विरूध्द एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत सक्त कारवाई करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार परवा दि.२७/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस हवालदार महेश गवळी यांना त्यांचे गोपनीय माहितीदारा व्दारे खात्रीशीर माहिती मिळाली

पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे देऊ नये:- मगनदास तावरे तालुका कृषी अधिकारी

Image
  पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे देऊ नये:- मगनदास तावरे तालुका कृषी अधिकारी. ------------------------------------- रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर.  -------------------------------------  राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरण्याची योजना सुरू केली आहे.मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी.एस.सी केंद्र चालक शेतकऱ्याकडून आगाव रक्कम वसूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा काढताना फक्त एक रुपया शुल्क द्यावा असे आव्हान रिसोड तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केले आहे.सीएससी केंद्र चालकांनी सुद्धा शेतकऱ्यांचा पंतप्रधान पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्याकडून अतिरिक्त रक्कम घेऊ नये अन्यथा सीएससी केंद्रावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी दिला आहे.सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते.त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. केंद्र चालकाने आग

भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. पूनम गरकळ हिचा सत्कार.

Image
  भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. पूनम गरकळ हिचा सत्कार. ------------------------------------ रिसोड प्रतिनिधी रणजित ठाकूर  ------------------------------------  रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. पूनम केशव गरकळ हिला इयत्ता दहावीच्या परीक्षेत विषयानुसार मराठी 85,हिंदी संस्कृत 95,इंग्रजी 88, गणित 98, विज्ञान 95 समाजशास्त्र 90 असे मार्क्स प्राप्त केले असून 500 पैकी 466 मार्क्स मिळवीत 93.20 टक्के गुण पटकावून प्रथम श्रेणी येण्याचा मान मिळविला आहे.दी. आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार अनंतरावजी देशमुख, संस्थेच्या संचालिका सौ. जयश्रीताई अनंतराव देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन कु. पूनम केशव गरकळ हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेतील  विद्यार्थिनी,सर्व शिक्षक - शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

रिसोड येथील तहसील कार्यालयात मतदार नाव नोंदणी सुधारणा कार्यशाळेचे आयोजन.

Image
  रिसोड येथील तहसील कार्यालयात मतदार नाव नोंदणी सुधारणा कार्यशाळेचे आयोजन. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर  ---------------------------------- रिसोड : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 27 जून रोजी सकाळी 11 वाजता रिसोड तहसील कार्यालयाच्या सभागृहात बीएलओ व पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी (महसूल) वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी 25 जून ते 25 जुलै या कालावधीत अद्ययावत केली जाईल, 25 जुलै रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, 20 ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली अनियमितता पाहता सर्वांनी सतर्क राहून त्यात कोणाचे नाव आहे की नाही हे तपासावे. जर नसेल तर या कालावधीत केवळ अपडेटसाठी फॉर्म क्रमांक 8 भरावा. अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी उपस्थित बीएलओ पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सांगितली. यावेळी तहसील, बीएलओ यांच्यासह

राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पदी डॉक्टर प्राध्यापक विश्वास पाटील कौलवकर.

Image
  राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पदी डॉक्टर प्राध्यापक विश्वास पाटील कौलवकर. ----------------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------------- राधानगरी येथील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांची 30 जूनला 24 रोजी मुदत संपल्या असल्याने त्यांच्या जागी डॉक्टर प्राध्यापक विश्वास पाटील कौलवकर यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे

गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझापामुळे पिकाचे नुकसान होणार पडला शेतकरी वर्गाला प्रश्न.

Image
  गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझापामुळे पिकाचे नुकसान होणार पडला शेतकरी वर्गाला प्रश्न. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे. -------------------------------------- राधानगरी.यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता मात्र अद्यापही याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. पावसाची सतत धार नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या रोपणीसाठी लोकांना वाट बघावी लागत आहे..महाराष्ट्रात ठीक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असला तरी खरीप पिकासाठी लागणारी पावसाची सतत धार पाहायला मिळत नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझाप मुळे पिकांचे नुकसान होणार काय हा एक प्रश्नच शेतकरी वर्गाला पडला आहे.. जूनच्या अखेरीस लोकांची रोप लावण्याची घाई असते मात्र भात पिकाला जास्त पावसाची गरज असल्याने अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी रोप लावणी चालू आहे तर ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत आहे

सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम यांनी गळफास घेत संपविले जीवन.

Image
  सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम यांनी गळफास घेत संपविले जीवन. --------------------------------- मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम --------------------------------- सांगली अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नवलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावाचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान (सुरज जनार्दन निकम वय 30 )यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून खानापूर तालुक्यावर शिवकाळ पसरली आहे.  नागेवाडी नागनाथ नगर येथील सुपुत्र सुरज निकम यांनी अल्पवधीत कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करून आपला धबधबा निर्माण केला होता कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना आसमान दाखविले होते त्यांनी अल्पवधीतच कुस्ती क्षेत्रात नवलौकिक निर्माण केला होता गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी कुमार महाराष्ट्र केसरीची गदा पटकवले होती सुरज निकम हा वडिलांच्या निधनानंतर व्यथित होता शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारा

रेमंड कंपनीतील ट्रेनी कामगारांचे आमरण उपोषण सुरूच ; कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष.

Image
  रेमंड कंपनीतील ट्रेनी कामगारांचे आमरण उपोषण सुरूच ; कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष. ----------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  कागल, प्रतिनिधी  कृष्णात मालवेकर  ----------------------------------- गेली ९ वर्षे कंपनी मध्ये ट्रेनी कामगार म्हणून अविरत सेवा बजावून सुध्दा कंपनी प्रशासनाने नियमित न केल्यामुळे कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र सदर उपोषणाची कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. इतकेच कमी की काय म्हणून कंपनीने कायद्याचा वापर करून आमरण उपोषणाची जागा देखील बदलण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले आहे. यामुळे एकूणच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या रेमंड उद्योग समूहातील रेमंड लक्झरी कॉटन कंपनी मध्ये कागल व परिसरातील अनेक कामगार गेली ९ वर्षे अविरत सेवा बजावत आहेत. आज ना उद्या कंपनी ट्रेनी कामगारांना नियमित सेवेत घेईल या आशेवर ९ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. तसेच गेली ९

कुंभी कासारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राहूल खाडे.

Image
  कुंभी कासारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राहूल खाडे. ----------------------------------- पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील  ----------------------------------- कुडित्रे (ता.करवीर) - येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राहूल बाजीनाथ खाडे (सांगरुळ)यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ माळवे होते. यावेळी अध्यक्ष माजी आ. चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.     उपाध्यक्ष पदाची संधी दरवर्षी एका संचालकांना देण्याचा फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे विश्वास पाटील (कोगे) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.शुक्रवारी नवीन उपाध्यक्षांची निवडीच्या बैठकीत राहूल खाडे यांचे उपाध्यक्ष पदासाठी संचालक अनिष जयसिंग पाटील (क। ठाणे) यांनी सुचवले. याला संचालक अनिल रावसो पाटील यांनी अनुमोदन दिले.    निवडीनंतर अध्यक्ष माजी आ.चंद्रदीप नरके म्हणाले नरके घराण्यावर कुंभी कासारीच्या सभासदांनी प्रेम व विश्वास आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या राहूल खाडेंच्या वडील बाजीनाथ खाडे यांनी डी.सी.नरकेच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.संस्थेच्या हितासाठी मिळालेल्

महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला जागतिक ओळख देणारा अर्थसंकल्प.

Image
  महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला जागतिक ओळख देणारा अर्थसंकल्प. -------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  -------------------------------- भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत. महिला, शेतकरी, युवक, दुर्बल घटकाला समर्पित अर्थसंकल्प. देशातील गरीब, महिला, शेतकरी आणि युवा या चार जातींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचे लाभ या वर्गांतील अखेरच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या संकल्पास पुरेपूर पाठबळ देऊन सरकारसोबत राहण्याची ग्वाही देणारा अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्राने देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपला सहभाग स्पष्ट केला आहे. अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. शेतकऱ्यांना समस्यामुक्तीसाठी भरघोस मदतीची हमी देतानाच सौरउर्जा पंप देण्याची महायुती सरकारची घोषणा राज्याच्या कृषी क्षेत्रास संजीवनी देणारी ठरणार आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी देणाऱ्या सरकारच्या या योजनेमुळे

छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणी तावडे हॉटेल ,परिसरात शिवप्रेमींकडून चक्काजाम.

Image
  छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणी तावडे हॉटेल ,परिसरात शिवप्रेमींकडून चक्काजाम. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  -------------------------------- पुणे हडपसर ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर १२ जून या दिवशी सायंकाळी ७ वाजता एका समाजकंटकाने दगड भिरकावला. त्यामुळे सर्व शिवभक्त, तसेच हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो शिवप्रेमींनी ,तावडे हॉटेल परिसरात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.  महापुरुषांची विटंबना करणार्‍या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी, पाकिस्तान मुर्दाबाद, जय श्री श्रीराम , भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करत.रास्ता रोको करण्यात आला. काही वाहनधारक आपले वाहन,बाजूने काढत जात असताना.आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत nh4 कडे पळत जात असताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.  आणि या कृत्याच्या मागे आणखी कोण आहे ?, याचे सखोल अन्वेषण करावे, अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले. कोणताही अनुसूचित प्रकार घडूनये यासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे , गांधीनगर पोलीस ठाण

जिल्हाप्रमुखांनी उचलले बंडाचे पाऊल, मुंबईच्या मातोश्री समोर होणार शक्तिप्रदर्शन?

Image
  जिल्हाप्रमुखांनी उचलले बंडाचे पाऊल, मुंबईच्या मातोश्री समोर होणार शक्तिप्रदर्शन? --------------------------------- चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि   मंगेश तिखट ----------------------------------  जिल्ह्यात अगोदरच शिवसेना उबाठा मध्ये पदाच्या बाबतीत मोठी रस्सीखेच असतानाचं आता जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुखांनी दोन जिल्हा प्रमुख असताना उपजिल्हा प्रमुख असलेले रवींद्र शिंदे यांच्या रूपाने तिसरा जिल्हा प्रमुख देऊन विद्यमान जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे व संदीप गिऱ्हे यांचे कार्यक्षेत्र बदलल्याने शिवसेना उबाठामध्ये मोठा राजकीय भूकंप आला असल्याचे बोलल्या जात आहे, दरम्यान पक्ष प्रमुखांच्या या निर्णयाविरोधात मातोश्री समोर दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील जवळपास दोनसे नाराज शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शिवसेना उबाठामध्ये विधानसभा निहाय विचार केला तर संदीप गिऱ्हे यांच्याकडे चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा हें विधानसभा क्षेत्र होते तर मुकेश जीवतोडे यांच्याकडे वरोरा चिमूर आणि ब्रम्हपुरी हें विधानसभा क्षेत्र होते, मात्र मुकेश जीवतोडे यांना वर

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती,सासू व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

Image
  विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती,सासू व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल,  ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  गांधीनगर प्रतिनिधी शशिकांत कुंभार ---------------------------------- माहेरहून लग्नात झालेल्या खर्चापोटी तीन लाख रुपये घेऊन ये आणि मुलाच्या बारशात पाहुण्यानी घातलेले दागिने आणलेस तरच तुला नांदवणार अशी धमकी देत  विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ व शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार रोहिणी विश्वजीत सोनुले वय 26 रा. गडमुडशिंगी ता.करवीर सध्या राहणार विचारे माळ कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून पती विश्वजीत विकास सोनुले,सासू शोभा विकास सोनुले, व सासरे विकास सदाशिव सोनुले सर्व राहणार गडमुडशिंगी यांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.  सासरच्या मंडळीकडून मुलगा गुरांचा डॉक्टर असे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात   माझी फसवणूक झाली आहे. ७ जानेवारी २०२१ ला लग्न झाले. लग्ना अगोरपासूनच पती विश्वजीत याना दारूचे व्यसन आहे. ते रोज रात्री अपरात्री नशेत येऊन मारहाण करीत असतो.सासरे विकास सोनुले आणि सासू  आपल्या मुलांचीच

चंद्रपूर सनसनिखेज:- प्रेमात दगफटका झाल्याने प्रियंकारानी केली प्रेयसीची हत्त्या.

Image
  चंद्रपूर  सनसनिखेज:- प्रेमात दगफटका झाल्याने प्रियंकारानी केली प्रेयसीची हत्त्या. ---------------------------------- चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि   मंगेश तिखट ---------------------------------- असं म्हटल्या जातं की प्रेमात आणि युद्धात सर्वकाही जायज आहे, म्हणजे सूट आहे, प्रेम विश्वात हरवलेल्या व एकमेकांच्या दिलावर राज्य करणाऱ्या प्रेयसी किंवा प्रियंकारांनी एकमेकांस दगफटका दिला तर नंतर काय होतं याचे अनेक किस्से चित्रपटातील कथेतून तर कधी वर्तमानपत्रातून पाहायला व वाचायला मिळत असतें अगदी अशाच चित्रपटातील प्रेमकथेचा थरारक प्रकार वरोरा शहाराला लागून असलेल्या आनंदवन येथे घडला असून प्रेमभंग झालेल्या समाधान माळी यांनी 24 वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचा क्रूरपणे खून केल्याची सनसनिखेज घटना काल दिनांक 26 जून ला उघडकीस आली आहे, दरम्यान आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या खुनाचा तपास सुरू आहे. आनंदवन येथील आनंद वनातील आश्रमात आई वडील यांच्यासोबत राहणाऱ्या 24 वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचे स्वतःचा उपचार करण्यासाठी आनंदवनात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधा

निवडे सरपंचांचा ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार - लक्ष्मण तांदळे

Image
  निवडे सरपंचांचा ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार - लक्ष्मण तांदळे -------------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र  कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरगें  -------------------------------------- निवडे ता. पन्हाळा निवडे येथील मागासवर्गीय, हरिजन बेगर वसाहतीमध्ये आरसीसी सिमेंट काँक्रीटच्या सन 2021/ 22 रस्त्याचा गैरवापर तर मागासवर्गीय, दलित एकही कुटुंब ज्या ठिकाणी रहात नाही त्या ठिकाणी आरसीसी काँक्रीट रस्ता करण्यात आला आहे. सदरचा रस्ता स्वतः च्या स्वार्थासाठी व स्वतःच्या शेतीकडे जाण्यासाठी निवडे गावचे सरपंच उज्वला सुतार यांनी केला असल्याचे युवा लहुजी संघर्ष  सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे. दलित वस्ती साठी काँक्रिटी रस्ता करण्यासाठी तीन लाख 99 हजार 526 रुपये हा निधी दलित वस्तीसाठी आला होता. पण दलित वस्तीमध्ये हा रस्ता न करता स्वतःच्या शेतीसाठी निवडे गावचे सरपंच .उज्वला सुतार यांनी  निधीचा केला गैरवापर!   ग्रामपंचायतीच्या विविध  कामात गैरवापर केला असून  या प्रकरणाची सखोल चौकशी  सीईओ जि. प.कोल्हापूर व पंचायत समिती पन्हाळा बी .डि.ओ यांनी तात्काळ

शाहु मिलच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करा : आमदार जयश्री जाधव.

Image
  शाहु मिलच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करा : आमदार जयश्री जाधव. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ----------------------------- विधानभवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन : शासनाच्या विरोधात व्यक्त केली नाराजी. कोल्हापूर : शाहु मिलच्या जागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधान भवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले.  शाहू मिल येथे छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने विधिमंडळामध्ये आवाज उठवला आणि न्याय मिळावा अशी भूमिका अनेकदा सभाग्रहामध्ये मांडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिली. परंतु अद्याप शासनाने यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल आमदार जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने शाहू मिल मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मार

प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य झाडे लावण्याचा उपक्रम राबविला .

Image
  प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य झाडे लावण्याचा उपक्रम राबविला. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम  ---------------------------------- आज दि 28 6 2024 रोजी कवठेमंकाळ सब डिव्हिजन एम एस ई बी मध्ये तीस झाडे लावण्याचा उपक्रम प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष मा. राजन दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबविण्यात आला  राजन कदम पत्रकारांशी बोलताना सांगितले की मानवी जीवनातही झाडाचे अन्याय साधारण महत्व आहे झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर करून मानव रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवतो.  शेंड यापासून मुळापर्यंत झाडाचे सर्व भाग मानवाच्या उपयोगी पडतात अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा झाल्यामुळेच भागवल्या जातात. झाडापासून कागद निर्मिती घडते झाडे मानवाला जीवनदर्शन घडवतात त्यांना तोडणाऱ्या नाही ती फळेच देतात त्याची परोपकारी कृती दाणीपणा कठीण प्रसंगात ही खंबीर राहण्याचे उचल वृत्ती आपण जीवनात कसे जगावे याचे पाठ देतात झाडाचे अस्तित्व मानवात उत्साहात भरते हिरव

विश्वंभर बाबा पायी दिंडी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान.

Image
  विश्वंभर बाबा पायी दिंडी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान. ------------------------------- मेढा प्रतिनिधी   शेखर जाधव -------------------------------  टाळी वाजवावी गुढी उभारावी , वाट ही चालावी पंढरीची " !! चला हो पंढरीला जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहु !! वै हभप भिकोबा महाराज देशमुख यांचे प्रेरणेने सुरू असलेली विश्वंभर बाबा वारकरी दिंडी सोहळा , वारकरी सेवा मंडळ , मेढा विभागाची दिंडी, दिंडी प्रमुख हभप अतुलमहाराज देशमुख यांचे उपस्थितीत शनिवारी २९ जुन रोजी मेढा येथील श्री विठ्ठल मंदिरातून प्रस्थान होणार आहे जावळीची राजधानी मेढा ते श्री क्षेत्र आळंदी ते श्री श्रेत्र पंढरपुर दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे आयोजीत केला आहे सदर दिंडीचा क्रमांक १६७ असुन दिंडी माऊलीचे रथाचे मागे असते .       दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपुर पायी प्रवास होणार आहे पंढरपुर येथे पोहोचलेवर एकादशी नंतर द्वादशीचा प्रसाद घेवून दिंडी परतणार आहे तालुक्यातील वारकरी , किर्तनकार , प्रवचनकार ,टाळकरी , अन्नदाते , देणगीदार , मृदंगमणी , गायक , हितचिंतक यांचे सहकार्याने २९ वर्ष दिंडी सोहळा सुरू आहे तसेच दिंडी मध्ये विश्वंभर बाबा वारकरी

शाहूंची जलनीती देशाला दिशादर्शक राधानगरीतील सिंचन परिसंवादातील सूर.

Image
  शाहूंची जलनीती देशाला दिशादर्शक राधानगरीतील सिंचन परिसंवादातील सूर. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे -------------------------------------    जलसिंचनामध्ये तंत्रज्ञान व विज्ञानाची मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असली तरी संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेली जलनीती ही देशाला आजही दिशादर्शक असल्याचा सूर राधानगरीच्या परिसंवादात उमटला.     पाटबंधारे विभागाच्या वतीने 'श्री.शाहू महाराज व त्यांचे जलसिंचन धोरण' या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता सौ स्मिता माने या होत्या.     यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ जे के.पवार म्हणाले की,शाहू महाराजांची जलनीती ही सर्वसामान्य प्रजेला केंद्रवर्ती ठेवून केलेली होती.ही जलनीती क्रांतिकारक अशीच असून त्यातही शेतीसाक्षरतेला अधिक महत्व असल्याने समाजाचे अर्थकारण वाढतच गेले.    डॉ.चंद्रशेखर कांबळे यांनी आज पाण्यावरून प्रादेशिक वाद व संघर्ष होत आहेत.मात्र शाहू महाराजांना शतकापूर्वी या पाण्याचे भविष्य समजले होते.वर्तमानातील जलप्रकल्प,त्यांची गळती पाह

सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ लोकराजा राजर्षी शाहू महाराज" – डॉ विलास खंडाईत

Image
 " सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ लोकराजा राजर्षी शाहू महाराज" – डॉ विलास खंडाईत ---------------------------------- वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ---------------------------------- वाई : दि.२६/६/२०२४ " छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड २६ जून १८७४ ते ०६ मे १९२२. केवळ ४८ वर्षे आयुष्य लाभलेले ते एक लोक राजे होते. कमी आयुष्य लाभलेले असूनही छ. शाहू महाराजांनी जो सामाजिक न्यायाचा लढा दिला तो दीपस्तंभ सारखाच होता. छ. शाहू महाराजांच्या राज्यारोहणानंतर अवघ्या बारा दिवसांनी सरकारी कामानिमित्त आलेल्या सरकारी अधिकारी यांच्या शिष्टाईसाठी होणारा खर्च गोरगरीब जनतेकडून न घेता कोल्हापूरहून आमच्या खाजगी खात्यातून खर्च करण्यात यावा. असा आदेश काढला. ०३ ऑगस्ट १९१८ रोजी महाराजांनी हुकूम काढून महार, मांग, रामोशी व बेरड या जातींच्या लोकांची हजेरी पद्धत कायमची बंद केली. महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी चार जाहीरनामे काढले. संस्थानातील कुल

रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन.

Image
  रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजितसिंह ठाकूर.  ----------------------------------- रिसोड येथील लोणी फाटा येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने 1जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनातील 8,9,10 एप्रिल 2024 चा उन्हाळी पिकाचे नुकसान झाले असून त्याचा मोबदला देण्यात यावा, भावांतर योजनेनुसार शेतकऱ्यांना सोयाबीनचा मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, पीक कर्ज वाटप न करणाऱ्या व पीक कर्ज देण्यास दिरंगाई करणाऱ्या सहकारी खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्यात यावी स्पिंकलर व ड्रीपची सबसिडी तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी रिसोड येथील भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने एक जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता रिसोड शहरातील लोणी फाटा या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन रिसोड

कोणताही पुरावा नसताना गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघड. दोन आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई.

Image
  कोणताही पुरावा नसताना गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघड. दोन आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी  शशिकांत कुंभार   ---------------------------------- जयसिंगपूर पोलीस ठाणेचे हद्दीत कवठेसार, ता. शिरोळ गांवचे हद्दीत वारणा नदीत दि.21.06.2024 रोजी एका वयस्कर महिलेची बॉडी बारदानाचे पोत्यात बांधून टाकलेली व ती सडलेले अवस्थेत जयसिंगपूर पोलिसांना मिळून आली होती. सदरची बॉडी ही कुजलेल्या अवस्थेत असलेने ओळख पटली नव्हती. तसेच सदर महिलेच्या उजव्या हातावर राम लक्ष्मण जोडी व बाशिंगचे गोंदण तसेच गळयामध्ये दोन तावीज याच गोष्टी होत्या. मयताची ओळख पटविणेकरीता फिंगर प्रींट ऑपरेटर यांचेकडून मयताचे फिंगरप्रींटची तपासणी केली परंतू मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने फिंगरप्रींट मिळून आल्या नाहीत. त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणेकडून प्राथमिक तपास करून अकस्मात मयत म्हणून दाखल करण्यात आले घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक इचलकरंजी निकेश खाटमोडे-पाटील , जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीमती रोहिणी साळुंखे,

सातारा लोकसभा निकालानंतरच्या निवडणूक रॅलीमध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघड... स्कॉर्पिओ जीप असा एकूण २७,७८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

Image
  सातारा लोकसभा निकालानंतरच्या निवडणूक रॅलीमध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघड... स्कॉर्पिओ जीप असा एकूण २७,७८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. ------------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी   अमर इंदलकर ---‐---------------------------------------------       दि.०४/०६/२०२४ रोजी दुपारी ३.५७ वा. चे. सुमारास ४५ लोकसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार मा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या रॅली मध्ये अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गळयातील ३.५० तोळे वजनाची चेन चोरुन नेली तसेच आणखी ५ इसमाच्या सोन्याच्या चेन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन नेल्या म्हणून दिले मजकुराचे फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.५०५/२०२४ भादविस का ३७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.      समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने तपास घेवून नमुद अज्ञात सोनसाखळी चोरांची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.

शहरात पुन्हा प्लास्टीक बॅगचा सर्रास वापर; संबंधितांचे दुर्लक्ष.

Image
  शहरात पुन्हा प्लास्टीक बॅगचा सर्रास वापर; संबंधितांचे दुर्लक्ष. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर   ----------------------------------- रिसोड शासनाने कॅरीबॅगच्या वापरावर बंदी घातली असून त्यात काही विशिष्ट जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करावा असे निर्देश दिले आहेत. मात्र, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा शहरात सर्रास वापर सुरू आहे. यासंदर्भात कुठलीही उपाययोजना न.प. प्रशासन करतांना दिसून येत नाही. प्लॉस्टीक कॅरिबॅग हा अविघटकशिल घटक असल्यामुळे पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा हास होत आहे. शहरात किरकोळ विक्रेते सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर करताना दिसून येत आहे; परंतु बंदी असतानाही या कॅरीबॅग येतात कुठून हा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासनाने ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घातली आहे. शहरात प्रतिबंधीत कॅरीबॅगचा वापर १०० टक्के बंद व्हावा, याकरिता न. प. प्रशासन कोणत्याही प्रकारचे प्रयत्न व. विशीष्ट जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करण्याचे आहेत निर्देश. कारवाई करताना दिसत नाही. व्यावसायिक व्यापारी, किराणा

मुस्लिम सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फैयाज अहेमद यांची नियुक्ति.

Image
  मुस्लिम सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फैयाज अहेमद यांची नियुक्ति. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर  --------------------------------- समाजाच्या समस्या व विकासासाठी झटणारी मुस्लिम सेवा संघ च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रिसोड चे माजी नगरसेवक फया अहेमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच त्यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले असून फैयाज अहेमह यांच्या नियुक्ती मध्ये संस्थापक अध्यक्ष फिरोज मासूलदार यांचा मोलाचा वाटा आहे. फैयाज अहेमद यांनी यापूर्वी मुस्लिम सेवा संघ च्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी असताना मुस्लिम समाजाच्या अनेक समस्या मार्गी लावून संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून संघटनेने प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. फैयाज अहमद यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.संभाजी ब्रिगेड च्या वतीने अभिवादन.

Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.संभाजी ब्रिगेड च्या वतीने अभिवादन. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर   ------------------------------------ दीन-दलित आणि शोषित वर्गाचे तारणहार राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. छत्रपती शाहू महाराजांनी 28 वर्षे कोल्हापूरचा कारभार पाहिला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक सुधारणा घडवून आणल्या. आपल्या राज्यात मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. तसेच वैदिक शाळांची स्थापना देखील केली. संस्कृत शिक्षणाचा प्रचार केला. धर्मग्रंथ शिकण्यास सर्व जातीतील विद्यार्थांना प्रेरित केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिसोड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले असून सर्वप्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला अनेक मान्यवरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. प्रसंगी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात तालुकाध्यक्ष

राजर्षी " शाहूं" ची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत "कागल" ची ओळख देशभर निर्माण करणार राजे समरजितसिंह घाटगे.

Image
  राजर्षी " शाहूं" ची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत "कागल" ची ओळख देशभर निर्माण करणार राजे समरजितसिंह घाटगे. -------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे -------------------------    राधानगरी धरणस्थळी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती भर पावसात हजारो शाहू भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी.         " बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. राधानगरी धरण उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरितक्रांती फुलविली. मात्र शाहूंच्या "कागल" ची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षांपासून कांही मंडळींनी हेतुपुरस्सर निर्माण केली आहे. आजही छत्रपती शाहूंच्या नावाने व्हाट्सॲप,गूगूल,विकिपीडियावर सर्च केल्यास आपणास शाहूंच्या कर्तुत्वाऐवजी केवळ येथील आरोप,प्रत्यारोप निदर्शनास येतात ही दुर्दैवी बाब आहे.अशी खंत व्यक्त करून राजर्षि शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस म्हणून येत्या काळात राजर्षी " शाहूं" ची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी

सांगली फाटा येथे विचित्र अपघातात आलिशान गाड्यांचे लाखांचे नुकसान.

Image
  सांगली फाटा येथे विचित्र अपघातात आलिशान गाड्यांचे लाखांचे  नुकसान. ----------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी अमित खांडेकर   ----------------------------------------- आज बुधवार दि.26 रोजी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथील सांगली फाटा उड्डाण पुलावर दुपारी 1 च्या सुमारास  हा अपघात घडला. सविस्तर माहिती अशी की सांगली फाटा येथील उड्डाणपुलावर दोन्ही बाजुंनी वाहतूक सुरू असलेने रस्ता आखूड झाला आहे.त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर गाड्यांचा वेग कमी होतो.दुपारी 1 च्या सुमारास एम एच ०६ ए क्यू  ०२३२ या क्रमांकाचा डंपर कोल्हापूर च्या दिशेने  चालला होता आणि त्याच्या पाठोपाठ एम एच १२ डब्लू क्यू ९८९८ या क्रमांकाची फॉर्च्यूनर व  एम एच सी एम ७५८५ या क्रमांकाची टाटा मांझा  ही कारगाडी कमी वेगात चालली  होती. तेवढ्यात या तिन्ही गाड्यांच्या मागे पाठोपाठ  एम एच ०९ जी जे ६२६६  या क्रमांकाचा दुसरा एक डंपर आला,चालकास अंदाज  न आल्याने त्याने टाटा मांझा गाडीला जोराची धडक दिली, त्यामुळे टाटा मांझा  गाडी ही फॉर्च्युनर गाडीला जाऊन धडकली  तसेच फॉर्च्यूनर गाडी ही

कराड मधील सराईत गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर एमपीडीए कायद्यान्वये सातारा जिल्हा कारागृहामध्ये एक वर्षाकरिता स्थानबद्ध.. कराड पोलिसांच्या कारवाईस यश.

Image
कराड मधील सराईत गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर एमपीडीए कायद्यान्वये सातारा जिल्हा कारागृहामध्ये एक वर्षाकरिता स्थानबद्ध.. कराड पोलिसांच्या कारवाईस यश. --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कराड प्रतिनिधी   वैभव शिंदे ---------------------------------------       कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील कुख्यात गुंडाने कराड शहरात विविध प्रकारचे 10 गुन्हे करुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही तो प्रशासन व न्यायालयांचे आदेशाचे उल्लंघन करीत गुन्हे करुन शहरात दहशत माजवित असलेने त्याचेवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई व त्यांस त्याचे गुन्हे करण्याचे सवयीतुन परावृत्त करणेकरीता कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व त्यांचे सहका-यांनी मा. पोलीस अधीक्षक सातारा मा. श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. श्रीमती आँचल दलाल मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. जिल्हादंडाधिकारी सातारा मा. जितेंद्र डुडी यांचे कार्यालयांस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अमोल ठाकुर यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर केलेला होता, त्याची चौकशी मा. उ

मुदाळ तिट्टा रस्ता व गटाचे काम येत्या आठ दिवसाच्या आत चालून केल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फसणार भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील

Image
  मुदाळ तिट्टा रस्ता व गटाचे काम येत्या आठ दिवसाच्या आत चालून केल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फसणार    भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे ---------------------------- भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याचे काम पूर्ण केले केलं नसून तसेच गटारी सुद्धा केले नसल्यानपावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात होण्याचे प्रमाण वाढत जाणार असल्याने याला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असणार आहे तरी भुदरगड येथील सार्वजनिक बांधकाम  खात्याने तातडीने पाऊस चालू होण्यापूर्वी रस्ता व गटारीची कामे येत्या आठ दिवसाच्या काम चालू नाही केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे पासून आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराचे निवेदन  भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी शिष्टमंडळामार्फत एका निवेद्वारे भुदरगड उपअभियंता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहे त्या शिष्ट मंडळात बाळासो शेवाळे दत्तात्रय पाटील चंद्रकांत पाटील हे होते

श्री शिवाजी विद्यालयात सामाजिक न्याय दिवस साजरा

Image
  श्री शिवाजी विद्यालयात सामाजिक न्याय दिवस साजरा. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर  ------------------------------------ येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज दिनांक 26 जून 2024 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. आज विदर्भातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाले, त्यानिमित्ताने आज पहिल्याच दिवशी शाळेची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करून करण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी काळाची गरज ओळखून त्या काळामध्ये बहुजनांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची सुरुवात केल्याचे सांगितले, ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळा

सांगलीमध्ये बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा 7 जणांना अटक.

Image
  सांगलीमध्ये बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा 7 जणांना अटक. --------------------------------- मिरज कुपवाड प्रतिनिधी   राजू कदम --------------------------------- सांगली. बनावट गिरी करून सरकारी नोकरी केल्याप्रकरणी दाखला गुन्हाचा तपास करत असताना विटा पोलिसांनी बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा लावला असून या प्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप प्रिंटर बनवत प्रमाणपत्रे गुणपत्रिका तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगांचे कागदे शाळा सोडल्याचे गोरे दाखले शिक्के असा ऐवज जप्त केला आहे यापूर्वी या टोळीवर बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते नेवरी ( ता खानापूर )येथे डाक पाल म्हणून नियुक्ती झालेल्या प्रमोद आमनणे यांच्या कागदपत्राचे पडताळणी करत असताना त्यांनी दिलेल्या दहावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पडताळणीत आढळून आले यामुळे याप्रकरणी हमने यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे...