कोल्हापूर बौद्ध समाजा तर्फे बुद्ध जयंती साजरी.
कोल्हापूर बौद्ध समाजा तर्फे बुद्ध जयंती साजरी.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------------
कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचे पूजन करण्यात आले सोबत अमोल कुरणे, निवास सूर्यवंशी आदी.
कोल्हापूर, दि. २३ (प्रतिनिधी) कोल्हापूर बौद्ध समाजातर्फे शिवाजी पेठेतील वेताळ गार्डन येथे २५८६ वी गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी धम्म ध्वजारोहण, त्रिशरण, पंचशील, सामूहिक बुद्ध वंदना, धम्मदेशना, धम्म पालन गाथा पठण करण्यात आली.
यावेळी भारती पाटील, निवास सुर्यवंशी, ॲड. राहुल सडोलीकर, अध्यक्ष अमोल कुरणे, संभाजी चौगुले, संचिता ठोंबरे, रवींद्र कुरणे, राज कुरणे, अशोक बावडेकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी, मनीषा कुरणे, समीक्षा ठोंबरे, तेजस्विनी वाघे, प्रियंका कुरणे, सुवर्णा कुरणे, कल्पना थोरात, वंदना कुरणे, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, अंजना धनवडे, प्रज्ञा पोवार, जयश्री वाघे, जमुना कांबळे, सारिका कांबळे, सुमन कुरणे आदी. उपस्थित होते.
Comments
Post a Comment