मुखेडात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न.
मुखेडात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुखेड प्रतिनिधी.
-------------------------------
तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम २०२४ पूर्व नियोजन आढावा बैठक व गुणनियत्रंण विषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रशिक्षणात जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी देगलुर,तालुका कृषी अधिकारी मुखेड यांनी उपस्थित कृषी निविष्ठा विक्रेते व कृषी चालकांना विविध कृषीविष्ठा विक्री करतांना कायदे अंतर्गत बांबीचे पालन करण्याच्या सूचना देत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार पांडुरंग गंगणर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी बाळासाहेब गिरी,देगलुर उपविभागीय कृषी अधिकारी सागर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, पेशकार गुलाब शेख,योगेश सावकार देबडवार,राम सावकार गुट्टे,पत्रकार महेताब शेख,संजय कांबळे, शेख बबल्लु मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकिप्रसंगी बियाणे विक्री संदर्भात माहिती देण्यात आली असुन यामध्ये कृषी व्यवसायकांनी कृषी निविष्ठा विक्री करताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचे आहे. जसे शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिली पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन बियाण्याची पेरणी करू नये,तूर व सोयाबीन पेरणी करते वेळी बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे आहे,त्यामुळे कीटकांचे व मर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, बी-बी एफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी पाऊसामुळे पिकांना पडणारा पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते तसेच कापूस लागवडीत शेतकऱ्यांनी कपाशीच्या झाडाची संख्या वाढविणे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होते.त्याचबरोबर कृषी निविष्ठा/ विक्रेते वितरक व निरिक्षकांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्वक निविष्ठा पुरविण्यासाठी सर्वांनीच प्रमाणीक पणे प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच सदरील कार्यक्रमांमध्ये कृषी दुकानदारांना सोयाबीनच्या प्रत्येक लॉटच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेण्याबाबत सूचना देण्यात आले व बियाणे उगवण क्षमता तपासणी कशी करावी यासंदर्भात जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी बालासाहेब गिरी, देगलुर उपविभागीय कृषी अधिकारी सागर गायकवाड यांनी प्रशिक्षणादरम्यान सर्वीस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुखेड पंचायत समितीचे कृषी अधिकारी गजानन हुंडेकर यांनी केले तर प्रस्ताविक कृषीधिकारी विकास नारनाळीकर यांनी केले.उपस्थितांचे आभार कृषी सहाय्यक सुनील कांबळे यांनी मानले.यावेळी कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच तालुक्यारील कृषी विक्रेता व शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment