पिंगलाक्षी देवी तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ समता फाउंडेशन चा उपक्रम.

 पिंगलाक्षी देवी तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ समता फाउंडेशन चा उपक्रम.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

----------------------------

 जिल्हा परिषद वाशिम यांच्या मालकीच्या पिंगलाक्षी देवी तलावातील गाळ काढण्याचे काम समता फाउंडेशन स्वखर्चाने करीत असून शेतकऱ्यांनी मोफत हा गाळ आपल्या शेतात टाकावा असे अवाहन समता फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

 समता फाउंडेशन व वाशिम जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पिंगलाक्षी देवी तलावातील गाळ उपसण्याचे काम गुरवार दिनांक 9 मे पासून सुरू करण्यात आले असून सर्व शेतकऱ्यांनी तलावातील गाळ मोफत आपल्या शेतामध्ये नेऊन टाकावा. मागील एप्रिल महिन्यामध्ये खाजगी स्वरूपात शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पिंगलाक्ष देवी तलावातील गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकला. चांगला सुपीक गाळ शेतकऱ्यांनी काढल्याने तलावामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून लेव्हल करणे, बेशरम वनस्पती काढणे, गोटे काठावर टाकणे इत्यादी कामे समता फाउंडेशनच्या मार्फत करण्यात येणार आहेत. मागील सहा वर्षा पासून समता फौंडेशन या तलावातील गाळ काढत असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्याना झाला असून तलावाची पाणी साठवण वाढली असून गाळामुळे शेताची पत सुधारली असून परिसरातील विहिरी व बोअरवेलची जल पातळी वाढली आहे. तसेच नाल्यावरती स्वखर्चाने बांध टाकून पाणी अडवले असून पाणी आडवा व पाणी जिरवा अंतर्गत खूप मोठे काम समता फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.