ट्रकच्या धडकने वारणानगरची महिला ठार राधानगरी येथील घटना.

 ट्रकच्या धडकने वारणानगरची महिला ठार राधानगरी येथील घटना.

------------------------------ 

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------ 

निप्पाणी देवगड राज्यमार्गावर असलेल्या राधानगरी बसस्थानकासमोर ट्रकच्या धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वारणानगर येथून नातेवाईकपर्यटणासाठी आले होते. काळम्मावाडी धरण पाहून  राधानगरी धरण पाहण्यासाठी येत असताना राधानगरी बस स्थानक शेजारी पाणी पिण्यासाठी थांबले होते. त्याच दरम्यान एम. पी .०९.७८०१ या भरधाव ट्रकची  धडक बसल्याने मोटर सायकल नंबर एम.एच.०९ एफ.एच ५८८५ वरील मागे बसलेल्या आसमा समीर सय्यद (वय ३०) रा. वारणानगर ता.पन्हाळा मूळ गाव झाकले. या जागीच ठार झाल्या.ही घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली. पती समीर सय्यद हे वारणानगर येथे दूध संघात नोकरीस आहेत. त्याना दोन लहान मुले आहेत. 

घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाले व महिलेचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. 

पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.