जिल्हा परिषदेत थकीत असलेल्या वेतन आयोगातील रकमेसाठी धडकले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षिका.
जिल्हा परिषदेत थकीत असलेल्या वेतन आयोगातील रकमेसाठी धडकले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षिका.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी एन देशमुख.
-----------------------------------------
.
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा कालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या जिल्हा भरातील सुमारे १ हजारावर शिक्षक शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या सातव्या वेतन आयोगातील एक नव्हे तर सलग तीन हत्याची रक्कम सेवानिवृत्ती झाल्यानंतरही मिळाली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त निवृत्ती शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी आज केली. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून आपला सेवा कालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवृत्त होऊन चार ते पाच वर्ष लुटून गेले. परंतु सातव्या वेतन आयोगाद्वारे मिळणाऱ्या हप्त्याची पहिली रक्कम सोडली तर त्यांना दुसरी तिसरी आणि तर त्यात त्याची रक्कम अद्यापि मिळालेली नाही. एवढेच काय तर गट विमा योजनेची रक्कम मिळालेली नाही. यामुळे हक्काचा पैसा मिळावा यासाठी सेवानिवृत्त झालेल्या हजारो शिक्षकांनी ही रक्कम मिळावी म्हणून प्रशासनाकडे पत्र विहार केला, निवेदनही दिले; परंतु पुढे काहीच झाले नाही. परिणामी जिल्हाभऱ्यातील सेवानिवृत्त झालेल्या हजारावर शिक्षकांना सन२०१६ ते २०२३ पर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्याची रक्कम अध्यापि मिळालेली नाही त्यामुळे आयोगाच्या थकीत हप्त्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, गट विम्याची रक्कम थकीत आहे.किर्तन सुद्धा त्वरित मिळावे आणि सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन १ तारखेला मिळावे, आदी मागण्या आठवड्यात निकाल काढाव्यात, अन्यथा जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषणात बसण्याचा इशारा सेवानिवृत्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदन द्वारे दिले आहे. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्याम पाटील, दीपक मुळे, संजय वानखडे, वासुदे रेचे, दिलीप चौधरी, इकबाल अहमद, मो. शकील, अ. रहमान, प्रशांत गुल्हाने, सविता चार्जन, शीला उल्ले, नलिनी लंगडे, व अनेक शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment