कोल्हापूर पोलीस दलाचे वार्षिक पथ संचलन. निरीक्षणा वेळी मा. विशेष पोलीस महा निरीक्षक, श्री सुनिल फुलारी यांनी केले कौतुक.

 कोल्हापूर पोलीस दलाचे वार्षिक पथ संचलन. निरीक्षणा वेळी मा. विशेष पोलीस महा निरीक्षक, श्री सुनिल फुलारी यांनी केले कौतुक.


----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------------------

आज दिनांक २९/०५/२०२४ रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फलारी सो यांनी, कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केले. सकाळी ०७.०० वा. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी मानवंदना दिली. त्यानंतर दिमाखदार व शिस्तबद्ध संचलनाचे नेतृत्व कोल्हापूर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यानी केले.


परेड ग्राऊंड येथे पोलीस विभागाकडुन विविध प्रत्याक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये कवायत, स्कॉड ड्रिल, शस्त्र कवायत, क्युआरटी पथकाचे टॅक्टीकल (दहशतवादी हल्ला परतवण्याचे) कवायत, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, बॅन्ड पथक अशा विविध कवायतीचे सादरीकरण कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केले. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री फुलारी यांनी उपस्थित अधिका-यांना आरोपीना बेडी घालणे विषयीच्या पध्दती बाबत मार्गदर्शन केले. याशिवाय दंगल काबु योजना प्रात्याक्षिकावेळी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दंगा काबु योजना प्रभावीपणे व यशस्वीरित्या कशा प्रकारे राबवावी या बाबत देखील मार्गदर्शन केले.


मा.विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कोल्हापूर जिल्हयातील पोलीस पाटील यांची बैठक घेतली. सदर बैठकी करीता ७० पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पाटील यानी जिल्हयातील रिक्त २७४ पोलीस पाटील पदे भरण्याबाबत, थकीत मानधन व प्रवास भत्ते बाबत प्रश्न उपस्थित केले. या उपस्थित केले प्रश्नाबाबत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक  यांनी आचारसंहिते नंतर शासन दरबारी पाठपुरावा करुन, पोलीस पाटलांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले व त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्या बाबत सुचना दिल्या. सदरच्या बैठकी दरम्यान नुकतीच पार पडलेली जोतिबा चैत्रयात्रा व लोकसभा निवडणुक बंदोबस्ता दरम्यान उल्लेखनीय कर्तव्य बजावलेबाबत गिरवली गावचे पोलीस पाटील श्री मोहन कदम यांचा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


यानंतर झालेल्या समारंभामध्ये दिनांक ३१/०५/२०२४ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील, कार्यालय अधिक्षिक श्रीमती रेखा पोवार, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणारे २० अधिकारी व अमंलदार यांचा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सारे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी अमंलदार तसेच मत्रांलयीन कर्मचारी यांच्या अडीअडचणी समजावून घेणे करीता पोलीस दरबार घेणेत आला. यावेळी वैदयकीय बिले, कुंटुब आरोग्य योजना, आश्वासित प्रगती योजनेतील त्रुटी या प्रश्नाबाबत विशेष लक्ष देवुन प्रश्न मार्गी लावणे बाबत आश्वस्त केले.


गुन्हयाचा आढावा बैठकीमध्ये जास्तीत जास्त गुन्हे हे शाबित व्हावेत याबाबत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मार्गदर्शन करुन, गुन्हे निर्गती, अर्ज निर्गती त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारी वेळीच सोडविणे बाबत सुचना दिल्या. यावेळी गुन्हे शाबिती करणा-या तपासी अधिकारी व सहा संचालक सरकारी अभियोक्ता अॅड.श्री एस. एस. गुजर, सहा सरकारी अभियोक्ता, अॅड. श्री ए. व्ही. विटकर, श्री एम. एम. पिरजादे, अॅड श्रीमती अमिती कुलकर्णी, अॅड श्री एस. एम. पाटील, तसेच अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. यु. एम. कुलकर्णी, अॅड. श्री एच. एन. मोहिते-पाटील, अॅड सुनिल तेली, अॅड श्री व्ही. जी. सरदेसाई, अॅड श्री ए.ए. महाडेश्वर यांचा सत्कार करण्यात आला .


मा. विशेष पोलीस निरीक्षक साो यांनी लोकसभा मतमोजणी प्रक्रिया बंदोबस्ताचा आढावा घेवुन त्यांना बंदोबस्ताचे योग्य नियोजन करणेच्या सुचना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.