पत्रकार केशव गरकळ यांची कन्या कु. पूनम केशव गरकळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश.

 पत्रकार केशव गरकळ यांची कन्या कु. पूनम केशव गरकळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश.

----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर.

----------------------------------

.नुकताच अमरावती विद्यापीठाचा इयत्ता दहावीचा निकाल  जाहीर झाला असून रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूनम केशव गरकळ हिने इयत्ता दहावी मध्ये 93.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.रिसोड येथील पत्रकार तथा उदयवार्ता न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी केशव गरकळ यांची कन्या कु. पूनम केशव गरकळ हिने रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातुन इयत्ता दहावीची परीक्षा दिली असून नुकताच अमरावती विद्यापीठाचा दहावीचा निकाल घोषित झाला असून 93.20 टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.पुनम गरकळ हिला मराठी विषयात 85 मार्क, हिंदी संस्कृत 95 मार्क, इंग्रजीमध्ये 88 मार्क, गणित विषयात 98 मार्क, विज्ञान मध्ये 95 मार्क तर समाजशास्त्र या विषयात 90 मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले असून एकूण 500 मार्कापैकी 466 मार्क घेऊन तिला 93.20% गुण प्राप्त झाले आहेत.पुनम गरकळ हिने आपल्या निवडीचे श्रेय आई वडील,शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार अनंतरावजी देशमुख,मुख्याध्यापिका मंजुषाताई देशमुख,वर्गशिक्षिका राजगुरू मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.पुनम गरकळ हिने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.