शांतीनिकतेनमध्ये बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या बीनिश वाच्छानीचा सत्कार.

 शांतीनिकतेनमध्ये  बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या बीनिश वाच्छानीचा सत्कार.

-------------------------------

फ्रंट ल्लाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

-------------------------------

  एका व्यापाऱ्याचा मुलगा सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून शांतिनिकेतन शाळेत प्रथम येतो, ही बाब गांधीनगर बाजारपेठेस प्रेरणादायी असून व्यापारी वर्गासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार  शिवसेना (उबाठा गटाचे) करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी काढले. बिनिश रमेश वाच्छांनी याचा शिवसेना, विविध संघटना व व्यापारी वर्गातर्फे शांतिनिकेतनमध्ये ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी राजू यादव बोलत होते.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्ञान तपस्वी राजाराम महाराज यांच्या करवीरनगरीने आम्हा सिंधी बांधवांना शैक्षणिक चळवळीचे बाळकडू दिले. सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनाचेच हे यश आहे, अशी कृतज्ञता बिनिष वाच्छांनी याचे वडील रमेश वाच्छांनी यांनी यावेळी व्यक्त केली. 

गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मुलांनी यापुढे एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत गौरवास्पद कामगिरी करून दाखवावी, अशी आशा रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा यांनी व्यक्त केली. दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, दीपक अंकल, किशोर कामरा, महेश सचदेव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी सलगर, श्याम धामेजा, विनोद तुलसानी यांच्यासह व्यापारी वर्ग, कामगार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- 

गांधीनगर येथे बीनिष रमेश वाच्छांनी याचा सीबीएसई बोर्ड परीक्षेत ९७.८० गुण मिळवून शांतिनिकेतन शाळेत  प्रथम आल्याबद्दल  विविध संघटना व व्यापारी वर्गातर्फे सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.