गांधीनगर परिसरात एसएससी परीक्षेत मुलींचीच बाजी.
गांधीनगर परिसरात एसएससी परीक्षेत मुलींचीच बाजी.
-------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
गांधीनगर:- गांधीनगर परिसरात झालेल्या साधू वासवानी हायस्कूल 4102 आठ केंद्रातील शाळेत एस.एस.सी परीक्षेत केंद्रात गांधीनगर हायस्कूलची ऋतिका यशवंत गिडवाणी या विद्यार्थिनीने 94.60% गुण तर न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगीची आदिती यल्लाप्पा मुर्डेकर हिने 94.60%, तर बापूसो पाटील हायस्कूल वसगडे या शाळेचा विद्यार्थी श्रेयश राजेंद्र जोगम यांने 94.60% गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या केंद्रात मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
गांधीनगर केंद्रात आठ शाळेंचा समावेश आहे . यापैकी छ. युवराज शाहू महाराज हायस्कूल गांधीनगर या शाळेचा निकाल 93.10% लागला. यामध्ये रोशनी नंदलाल केसवानी 90.80%, गुण मिळवले.
न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी शाळेचा निकाल 96.46% लागला.यात अदिती यल्लाप्पा मुर्डेकर 94.60%, गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
समर्थ विद्यालय उचगाव शाळेचा निकाल 97.56% लागला. या शाळेत भक्ती प्रताप घरमोडे हिने 86.40 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
गांधीनगर हायस्कूल गांधीनगर शाळेचा निकाल 98.76% लागला असून केंद्रात शाळा अव्वल ठरली आहे. त्यामध्ये ऋतिका यशवंत गिडवाणी हिने 94.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
ब्रँच विक्रम हायस्कूल न्यू वाडदे शाळेचा निकाल82.35% लागला. हर्षदा गुंडोपंत पाटील हिने 79.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
स्वामी शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर शाळेचा निकाल 97.50% या शाळेत हुजेफा आरिफ राशिवडेकर हीने 91.20% गुण मिळवून प्रथम आली.
डॉ.कु. मालती मोहनलाल दोशी हायस्कूल वळीवडे या शाळेचा निकाल 97.89% लागला या शाळेत सृष्टी रामचंद्र पोवार हीने 86.20% गुण मिळवून शाळेत अव्वल आली आहे.
चिंचवाड हायस्कूल चिंचवाड शाळेचा निकाल 96.87% लागला. यामध्ये समृद्धी नितीन जाधव हिने 90.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
तर वसगडे येथील बापूसाहेब पाटील हायस्कूल या शाळेचा निकाल 97.10% लागला असून या शाळेत श्रेयश राजेंद्र जोगम यांनी 94.60% मिळवून अव्वल आला आहे. एकूणच करवीर पूर्व भागात झालेल्या एसएससी परीक्षेत मुलींनीच गड जिंकल्याची पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
फोटो:-
गांधीनगरातील केंद्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या 1) ऋतिका यशवंत गिडवाणी
2) आदिती यल्लाप्पा मुर्डेकर
3) श्रेयश राजेंद्र जोगम
Comments
Post a Comment