लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने ४५-सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतमोजणी ही सातारा शहरातील नवीन एम.आय.डी.सी. हद्दीत डी.एम.ओ. गोडावुन येथे.
लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने ४५-सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतमोजणी ही सातारा शहरातील नवीन एम.आय.डी.सी. हद्दीत डी.एम.ओ. गोडावुन येथे.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------
दि.०४/०६/२०२४ रोजी होणार आहे.या मतमोजणीचा निकाल ऐकण्याकरीता मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होणार असलेने डी.एम.ओ. गोडावुन परिसरात मतमोजणी कालावधीत वाहतुक व्यवस्थेत बदल केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे जाहीर केले.
पोलीस अधीक्षक यांना सातारा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि.०३/०६/२०२४ रोजीचे ११.५५ वा. पासुन ते दि.०४/०६/२०२४ रोजीचे रात्रौ २०.०० वा.पर्यंत खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करीत आहे याची नोंद घ्यावी.
वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग-
दि.०३/०६/२०२४ रोजीचे ११.५५ वा. पासुन खालील नमुद मार्गावर वाहतुकीकरीता बंदी करणेत येत आहे.
१) वेणुगोपाल फुड्स (पारले कंपनी) ते कवित्सु कंपनी युनिट नं. २ कंपनीकडे डी.एम.ओ. गोडावुन समोरुन येणारे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना (शासकीय वाहने वगळून) येणे जाणेस पुर्णतः प्रवेशबंदी करणेत येत आहे.
२) सुटकेस चौक येथुन वेणुगोपाल फुडस कंपनीकडे येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
३) अजिंक्यतारा सहकारी कृषीकेंद्राकडुन कृषीटेक कंपनी मार्गे डी.एम.ओ. गोडावुनकडे येणारे-जाणारे सर्व वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
४) भोर फाटयाकडुन डी.एम.ओ गोडावुनकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना (शासकीय वाहने वगळून) प्रवेशबंदी करणेत येत आहे.
पार्किंग ठिकाणे -
१) भोर फाटा येथुन नवीन एम.आय.डी.सी. कडे जाणारे वाहने रोडचे बाजुला पार्किंग करता येतील. २) जानाई मळाई रस्त्याने निवडणुक मतमोजणी निकालासाठी येणारे वाहनांना तळयाजवळील पार्किंगपर्यंत जाता येईल.
तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे. सदरची अधिसुचना माझ्या स्वाक्षरी व शिक्कयानिशी दि.०३/०६/२०२४ रोजीचे रात्रौ ११.५५ वा. पासुन तात्पुरत्या स्वरुपात लागु करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment