मुलीच्या शुभविवाह प्रसंगी पित्याने केले आनोख्या पध्दतीने मान्यवरांना केले सन्मानित.

 मुलीच्या शुभविवाह प्रसंगी पित्याने केले आनोख्या पध्दतीने मान्यवरांना केले सन्मानित.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 भणंग प्रतिनिधि

 शेखर जाधव

---------------------------------

 भणंग :- सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मामुर्डी गावचे आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा उपध्यक्ष ,तसेच सरपंच परिषद सातारा जिल्हा उपध्यक्ष श्री.बजरंग खाशाबा चौधरी यांच्या मुलीच्या शुभविवाह प्रसंगी आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींना शाल, श्रीफळ,आणि मराठ्यांसाठी मार्गदर्शिका राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद कोंढरे निर्मिते आजचा निश्चय पुढच पाऊल पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दीडशे ते दोनसे पुस्तकांचे वाटप करण्यात आले या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीच्या हे पुस्तक वाचनात येईल त्यांच्या मनात एक नवचैतन्य निर्माण झाल्या शिवाय राहाणार नाही ज्ञानाची आस ,गुणवत्तेचा विकास, गुणवत्तेचा ध्यास , शेती पुरक व्यवसाय,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, अनेक अशा विषयांवर आधारावर सव्वीस अनुक्रमणिका असलेल असे हे पुस्तक आहे जवळपास दिडशे ते दोनशे घरा घरात पोचविण्याचे काम बजरंग चौधरी यांनी केलल आहे आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे प्रत्येक क्षेत्रात पुढे आला पाहिजे अशी वाटणारी तळमळ या माध्यमातून दिसून येते आपल्या मुलीच्या लग्नात केलेले हे ज्ञानदानाचे कार्य महान आणि कौतुक स्पद ठरेल यात मात्र शंका नाही या पुस्तकाची किमत जवळपास दोनशे ते तीनशे असू शकते या पुस्तकाची किंमत करु शकत नाही असे आमृत रुपी पुस्तक मार्गदर्शक ठरेल अशी आपेक्षा आहे हे पुस्तक अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुक्यातील, जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या कडे संपर्क करा आल्पदरात मिळतील अशा या विवाह सोहळ्या मध्ये जे ज्ञान दाणाचे महान कार्य केले त्या बद्दल सर्व स्तरावर कौतुक होत आहे न्युज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदकर सातारा जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा तसेच द् युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपध्यक्ष.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.