द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रयत्नाने भेटला वार्ताहाराला न्याय!

 द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रयत्नाने भेटला वार्ताहाराला न्याय!

-------------------------

जावली  प्रतिनिधी 

शेखर जाधव 

-------------------------

शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील वार्ताहार प्रकाश वसंत पवार यांची माजी सरपंच तसेच नवनिर्वाचित सदस्य यांचा मुलगा यांनी नाहक बदनामी करत सगळ्या पंचक्रोशीत चर्चे ला उधान आणले होते. वार्ताहाराने बातम्या छापू नये म्हणून काही राजकीय मंडळीच्या सांगण्याने सत्याची बाजू मांडणाऱ्या वार्ताहाराची बदनामी केली. संबंधित चर्चेचा प्रकार त्याच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत संबंधीताशी संपर्क केला आसता त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ केली. मानसिक मानहानी झाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दि.२१/५/२०२४ रोजी तक्रार अर्ज देत पुणे जिल्हाध्यक्ष शौकत शेख यांनी पवार यांची भेट घेउन गुन्हा दाखल होईपर्यत पाठपुरवठा केला 

तसेच पदाधिकार्यांनी पोलीस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची भेट घेवून सर्व प्रकार सांगितला.

     द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी संबंधित विषयाबाबत चर्चा करून योग्य न्याय देण्याची मागणी केली. पुणे जिल्ह्यासह तालुक्यातील पत्रकार सदस्य व शिरुर तालुकाध्यक्षांनी देखील पाठबळ देत पत्रकार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

दि.२२/५/२०२४ रोजी संबंधितांनवर गुन्हा नोंद करण्यात आला.

पत्रकारांनवर हल्ले, अन्याय होत असल्यास त्यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघ केव्हा ही पत्रकारांच्या पाठीशी उभी असुन कायदेशीर मार्गदर्शन करणार तसेच विविध पत्रकार संघांनाही ते नेहमीच पाठींबा देणार आसल्याबाबत संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी संगितले.

राज्य सह सचिव विवेकानंद फंड यांनी राज्यात पत्रकारांचे संघटन करून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यास आम्ही कटीबद्ध राहणार आसल्याचे सांगितले.

वार्ताहाराला न्याय मिळावा म्हणून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या पदधिकाऱ्यानी पाठींबा देत मोलाचे योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.