खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते कु. पूनम केशव गरकळ चा सत्कार.
खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते कु. पूनम केशव गरकळ चा सत्कार.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर.
----------------------------
नुकताच अमरावती विभागीय बोर्डाचा एस.एस.सी (दहावी) निकाल जाहीर झालाय. रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूनम केशव गरकळ हिनै दहावीत 93.20 टक्के गुण पटकावून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल वाशिम यवतमाळ लोकसभेच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते रिसोड येथील त्यांच्या खासदार कार्यालयात सत्कार करण्यात आला. कु. पुनम गरकळ हिला विषय निहाय मराठीत 85%, हिंदी संस्कृत 95%, इंग्रजीत 88 %, गणित 98%, विज्ञान 95%, समाजशास्त्र 90 % एकूण 500 माकपैिकी 466 मार्क्स म्हणजे 93.20% गुण प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे,जाधव सर, वंजारी महासंघाच्या महिला जिल्हा अध्यक्षा अपर्णा जायभाये गरकळ, केशव गरकळ, माया गरकळ यांच्यासह वंजारी समाजाच्या महिला उपस्थित होत्या. खासदार भावनाताई गवळी यांनी कु. पूनम गरकळ हिचा शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment