वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल तहसीलदार व मुख्याधिकारी न.प यांचे श्रमिक पत्रकार संघाकडून अभिनंदन.
वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल तहसीलदार व मुख्याधिकारी न.प यांचे श्रमिक पत्रकार संघाकडून अभिनंदन.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------------
श्रमिक पत्रकार संघ रिसोड तालुक्याच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या सह सर्व प्रशासकीय यंत्रनेचे सोमवार दि 6 मे ला विशेष अभिनंदन केले.जिल्हाधिकारी भूवनेश्वरी एस यांच्या निर्देशनुसार व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तेजनकर व त्यांची सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी संपूर्ण तालुक्यात तसेच नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा व त्यांची सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी संपूर्ण रिसोड शहरात मतदान जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल श्रमिक पत्रकार संघ रिसोड तालुका अध्यक्ष रवि अंभोरे यांच्या नेतृत्वात अधिकाराऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. प्रसंगी तालुका अध्यक्ष रवि अंभोरे सह उपाध्यक्ष राहुल जुमडे, कार्याध्यक्ष रणजीत ठाकूर, सचिव गजानन बाजड, प्रसिद्धी प्रमुख अजय कानडे, संघटक तौसिफ़ शेख, सहसंघटक राजू नेहूल,सह सचिव आत्माराम जाधव, कोषाध्यक्ष गोपाल पाटील खडसे, संघटक गजानन साळेगावकर, गणेश कवडे,फय्याज कुरेशी,मार्गदर्शक भारत गवळीकर, भारत कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.श्रमिक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कार्याची दखल घेऊन अभिनंदन केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष धन्यवाद दिले व पुढील कोणतेही कर्तव्य बजावताना अधिक चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment