कौलवच्या डॉ सुरेश अंबाजीराव पाटील यांनी केलं मरणोत्तर नेत्रदान.

 कौलवच्या डॉ सुरेश अंबाजीराव पाटील यांनी केलं मरणोत्तर नेत्रदान.

-------------------------------

कौलव प्रतिनिधी 

संदीप कलिकते

-------------------------------

कौलवचे सुपुत्र डॉ.अशोकराव अंबाजी पाटील यांचे नुकतेच निधन झाले.कोगनोळी,कसबा बावडा,देवकर पाणंद, कोल्हापूर येथे त्यांनी गेली ४०वर्षे वैद्यकिय सेवा दिली.ते सुपरिचित व सेवाभावी डॉक्टर होते.

       अलिकडे ते काही दिवस आजारी होते.त्यांचे परवा निधन झाले.त्यांचे वय ७५ वर्षे होते.मृत्यू पश्चात त्यांचे नेत्रदान करण्यात आले.त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आला.हा प्रकाश देण्याचे महत्वपूर्ण काम सांगलीच्या "नंदादीप आय केअर सेंटर ने केले. यासाठी डॉ. अशोक पाटील यांची कन्या डॉ. मनिषा रणधीर ढोबळे व कोल्हापूरचे प्रसिद्ध डॉ. रवींद्र शाम येडेकर यांची यामधील भूमिका महत्वाची होती.कौलव मधील. त्यांचे भाऊ श्री.शिरीष अंबाजी पाटील (सेवानिवृत्त कृषी अधिकारी) श्री.रमेश अंबाजी पाटील ( पूजा नर्सरी ) ,मुलगा श्री.महेंद्र अशोकराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून नेत्रदानाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे....

    निसर्गाने निर्माण केलेली मानव जात मृत्यूनंतर निसर्गामध्येच विलीन होणार.पण अलिकडे विज्ञानाने लावलेल्या शोधामुळे मृत्यूनंतरही मानवी अवयवांचा इत्तरानां होणारा उपयोग अभिमानास्पद आहे. डॉ. अशोकराव पाटील आपल्यातून जरी गेले असले तरी नेत्रदानामुळे त्यांची किर्ती मागे राहिली आहे.

  .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.