संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या तलाठ्या कडे तात्काळ आधार व राशनकार्डची झेरॉक्स द्या... तहसीलदार तेजनकर.
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या तलाठ्या कडे तात्काळ आधार व राशनकार्डची झेरॉक्स द्या... तहसीलदार तेजनकर.
-------------------------------
रिसोड/ प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------------
..शासनाच्या जनकल्याणार्थ सुरु असलेल्या अनेक योजनापैकी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना या ग्रामीण भागातील वयोवृद्ध व निराधारांना आर्थिक आधार देणाऱ्या योजना आहेत.या योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. तहसील कार्यालय रिसोड अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची अनुदानची रक्कम शासनाच्या निर्देशानुसार डिबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यात सरळ जमा होणार आहे.त्याकरिता लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्ड व रेशन कार्डची झेरॉक्स सह आपला अचूक नंबर आपल्या गावातील तलाठ्याकडे तात्काळ जमा करण्याचे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment