एम पी डी ए कायद्यान्वये कराड शहरातील कुप्रसिध्द गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर सातारा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध.

 एम पी डी ए कायद्यान्वये कराड शहरातील कुप्रसिध्द गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर सातारा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  

कराड प्रतिनिधी 

 वैभव शिंदे

---------------‐-----------

          याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर स्टेशन हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार कुंदन जालींदर कराडकर वय २७ वर्षे रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर ता. कराड जि.सातारा, याचे विरुद्ध MPDA कायदया अन्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव श्री, कोंडीराम पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेला होता. नमूद प्रस्तावाची अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पडताळणी करुन श्री, समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा व अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्फतीने MPDA कायदया अन्यये स्थानबध्द करणे बाबतच्चा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.

      मा. श्री जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी स्थानबद्ध इसमाने स्वतः तसचे साथीदारांच्या मदतीने मृत्यू किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा, मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भिती घालून अपहरण करणे, जबरी चोरी करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला

किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, दुखापत, हमला किंवा गैरविरोध करण्याची पूर्व तयारी करुन गृहआगळीक करणे, दंगा मारामारी करणे, चोरी करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणं हददपार आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवाना हददापार केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे, सुर्यास्त व सुर्योदय यांचे दरम्यान संशयास्पद स्थितीत मिळुन येणे असे गुन्हे केलेने तसेच स्थानबद्ध इसमाकडून सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व तो धोकादायक व्यक्ती झालेची खात्री झालेने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी MPDA कायदयान्यये कुंदन जालींदर कराडकर वय २७ वर्षे रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापुर ता. कराड जि. सातारा, याचा दिनांक ०८/०५/२०२४ रोजी पासून ०१ वर्षांकरीता सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश पारीत करणेत आला असून त्यास ताब्यात घेवुन सातारा जिल्हा मध्यवती कारागृह येथे स्थानबद्ध करणेत आले आहे.

       नोव्हेंबर २०२२ पासून १० मोक्का प्रस्तावामध्ये १२८ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत, म.पो.का. कलम ५५ प्रमाणे २५ उपद्रवी टोळयांमधील ८१ इसमांना, म.पो.का. कलम ५६ प्रमाणे २६ इसमांना, म.पो. का. कलम ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण ११० इसमांविरुध्द तडीपार सारखी तसेच MPDA कायदयान्वये ०२ इसमांवरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द मोक्का, हददपार, एम.पी.डी.ए. अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार आहेत.

     समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा व त्यांचे मार्गदर्शनाखाली अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड, सविता गर्जे उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग पाटण, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक, पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक, संजय देवकुळे सहाय्यक पोलीस फौजदार कराड शहर पोलीस स्टेशन, पो. हवा. अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच पोलीस शिपाई आनंदा जाधव, महिला पोलीस शिपाई सोनाली पिसाळ व कराड शहर डी. बी. पथकातील सर्व अंमलदार यांनी MPDA कायदयान्वये अंतर्गत कारवाई करणेसाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.