ओलवण भटवाडी बॅक वॉटर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मायालेकीसह तिघांचा दुदैवी अंत .
ओलवण भटवाडी बॅक वॉटर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मायालेकीसह तिघांचा दुदैवी अंत.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------
राधानगरी तालुक्यातील ओलवनभटवाडी येथील बॅक वॉटर ला हातकणंगले तालुक्यातील तळदंगे गावामधील मायालेकीसह भैरीबांबर येथील मुलग्याचा अशा तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत अधिक माहिती राधानगरी तालुक्यातील ओलवान पैकी भटवाडी येथे फिरण्यासाठी आलेल्या सतीश लक्ष्मण टिपू ग डे वर्ष 35 राहणार भैरी बांबर तालुका राधानगरी अश्विनी राजेंद्र मालवेकर वर्ष 32 व प्रतिक्षा राजेंद्र मालवेकर वय वर्ष तेरा या दोघीजणी राहणार सावर्डे तालुका कागल सध्या राहणार तळंदगे तालुका हातकणंगले हे तिघेजण पोहोण्यासाठी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेजण बुडून मयत झाले आहेत त्यांचे मृतदेह तरंगत असल्याचे दिसल्यावर ते मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टम साठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे
त्याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे करत आहेत
Comments
Post a Comment