सानिका स्पोर्ट्स मुरगुड यांचे कार्य समाजाभिमुख प्राचार्य एस पी पाटील.
सानिका स्पोर्ट्स मुरगुड यांचे कार्य समाजाभिमुख प्राचार्य एस पी पाटील.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगुड /प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------
येथील सानिका स्पोर्ट्स ने आज पर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. गरजूना मदतीचा हात कायम पुढे करून सेवा करण्याचे काम या स्पोर्ट्स मार्फत अव्याहतपणे सुरू आहे. सानिका स्पोर्ट्स चे कार्य कौतुकास्पद असून ते समाजाभिमुख आहे असे प्रतिपादन मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजचे प्राचार्य एस पी पाटील यांनी केले
ते मुरगूड ता. कागल येथे सानिका स्पोर्ट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ सोडत प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते यावेळी बिद्रीचे माजी संचालक दत्तामामा खराडे माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस संतोष वंडकर, पीएसआय पांडुरंग कडवे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते
स्वागत पै. राजू चव्हाण यांनी केले प्रास्ताविकात सानिका स्पोर्ट्स चे संस्थापक अध्यक्ष दगडू शेणवी यांनी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात जर एखाद्याला मदतीची गरज असेल तर ती आपल्या स्पोर्ट्समार्फत पूर्ण करणार असून अशा गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दतामामा खराडे,मा.उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले संतोष कुमार वंडकर, अँड सुधीर सावर्डेकर, यांची भाषणे झाली यावेळी बजरंग सोनुले,अमर चौगुले,निवास कदम, सुनिल भावके, विजय राजिगरे,सिध्दू दिवटे,सागर सापळे,आदी मान्यवर उपस्थित होते. आभार रतन जगताप यांनी मानले
Comments
Post a Comment